Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

आता व्हॉट्सअ‍ॅॅॅॅॅॅपवर स्टेटस करता येणार एडिट


Status can now be edited on WhatsApp

व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत राहते. फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप फोटो एडीट करण्यासाठी Undo आणि Redo या दोन नवीन बटणांवर काम करत आहे. Undo बटणामुळे तुम्ही स्टेटस ठेवताना काही चूक झाली तर ती लगेच दुरुस्त करता येणार आहे, अशी माहीती आहे.




WABetaInfo च्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार, लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप एका खास फीचरवर काम करत आहे. ते फीचर आल्यानंतर वापरकर्त्यांना चूकून पोस्ट केलेले स्टेटस अपडेट लगेच डिलीट किंवा दुरुस्त करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये या फीचरच्या माध्यमातून Undo बटण दिले जाईल. हे बटण Status Sent मेसेजच्या समोर दिले जाणार आहे. बऱ्याच वेळा असे होते की, अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने स्टेटसवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केले जातात. म्हणून या बटणाने तुम्ही एखादा स्टेटस ठेवला तर त्यात तुम्ही दुरुस्ती करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस डिलीट करण्याचा पर्याय आधीच मिळतो. याआधी वापरकर्त्यांना स्टेटस सेक्शनमध्ये जाऊन स्टेटस सिलेक्ट करावे लागत असे आणि त्यानंतर तुम्ही ते डिलीट करू शकत होता. तोपर्यंत तुमच्या कॉन्टॅक्टमधील बरेच जण कदाचित ते स्टेटस पाहू शकतात. अशा परिस्थितीत, हे फीचर तुम्हाला कामी येईल.

जेव्हा तुम्ही स्टेटस अपडेट Undo कराल, तेव्हा तुम्ही ते डिलीट देखील करू शकता. तुम्ही स्टेटस डिलीट केल्यावर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला त्याबद्दल माहिती देईल. Status Update (स्टेटस अपडेट) साठी Undo बटण सध्या WhatsApp बीटाच्या Android व्हर्जन 2.21.22.6 वर टेस्ट केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडून चाचणी पूर्ण केल्यावर, आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी हे फिचर प्रसिद्ध करेल, असं व्हॉट्सअ‍ॅपनं सांगितलं आहे.

Status can now be edited on WhatsApp

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.