Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

पैठण येथील प्रेक्षणीय स्थळांचा विकास व शुशाेभीकरण‌ करा

 


विहामांडवा प्रतिनिधी/इम्तीयाज शेख


पैठण हे प्रसिद्ध प्राचीन नगर व तालुक्याचे ठिकाण असुन सध्याचे पैठण हे प्राचीन प्रतिष्ठान व जास्त प्रख्यात आणि दीर्घ इतिहास असलेले स्थळ आहे.या प्राचीन नगरीशी इतिहासातील अनेक घटना निगडित आहेत.प्राचीन ऐतिहासिक तसेच आद्य मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणारे पैठण हे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे संत एकनाथ व ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याशी निगडीत प्रसिद्ध प्राचीन नगर व  ठिकाण आहे.पैठणला प्राचीन काळापासून सांस्कृतिक परंपरा, इतिहास व व्यापारी केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झालेले आहे.पैठण शहर हे मराठवाड्याचं महाप्रवेशद्वार मानलं जातं. पैठण शहराचं ऐतिहासिक वलय आजही प्रकर्षानं पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. 


अनादी काळापासून पैठणला कलासौख्य देखील लाभलेले आहे.पैठणची पैठणी हा त्याचाच भाग आहे.अनेक ऐतिहासिक,धार्मिक व पर्यटक क्षेत्रे या पैठण परिसरात आहेत.पैठण मध्ये अनेक प्रचीन वास्तूंचे अवशेष ही आढळतात.

या ऐतिहासिक शहराला भेट देण्यासारखे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ आहेत. जसे की संत ज्ञानेश्वर उद्यान,जांभूळ बाग,नाग घाट लहु सावकाराचा वाडा,जामा मशीद, तीर्थ खांब, मौलाना साहब दर्गा, दिगंबर जैन मंदिर पैठण, सात बंगला पैठणी साडी केंद्र,जुने कावसान नाथ सागर धरण,नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण,इ.अनेक स्थळांना भाविक व पर्यटक या शहराला भेट देत,  असतात,नतमस्तक होत असतात. पूर्वी या शहराला भेट देणाऱ्या भाविक,पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होती.

पंरतु पैठण-औरंगाबाद रस्ता,पैठण शहरातील अंतर्गत रस्ते व स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे,धार्मिक व पर्यटन क्षेत्राची झालेल्या दुरवस्थेमुळे, पैठण शहराला भेट देणाऱ्या भाविक,पर्यटकांची संख्या अत्यंत घटली आहे.त्यामुळे व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.पैठण या प्राचीन नगरीशी महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक घटना निगडित आहेत.तरी पैठण शहरामध्ये असंख्य असे प्रेक्षणीय,धार्मिक
स्थळे आहेत.

 पंरतु सदर प्रेक्षणीय स्थळांचा पूर्ण:त विकास झाल्याचे दिसून येत नाही.सदर प्रेक्षणीय स्थळांची अत्यंत दुरवस्था झाल्याचे दिसून येते.जर पैठण येथील प्रेक्षणीय स्थळांचा विकास व शुशाेभीकरण झाले तर नक्कीच पर्यटकांची संख्या अधिक वाढेल व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे देखील जतन होईल.तसेच प्रेक्षणीय स्थळांच्या आजूबाजूच्या परिसराचा देखील विकास होईल. तसेच छोट मोठ्या उद्योगधंद्याला , व्यापारपेठेला,बाजारपेठेला देखील चालना मिळेल व पैठणच्या भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळेल.

तरी लवकरात लवकर पैठण येथील प्रेक्षणीय स्थळांसाठी निधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांचा विकास करण्यात यावा अथवा या प्रेक्षणीय स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध असेल अथवा मिळाला असेल तर ताे निधी याच ठिकाणी खर्च करण्यात यावा व पैठणच्या प्रेक्षणीय स्थळांचा विकास व शुशाेभीकरण करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.    ‌‌

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.