विहामांडवा / प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील आर . वाय . पी .कला महाविद्यालय येथे दि .२८ ऑक्टोबर गुरुवार रोजी लसीकरण शिबीर घेण्यात आले.
कोविंड १९ या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महाविद्यालयात लसीकरण शिबिर घेण्यात आले . या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . माधव फड यांचे हस्ते रिबीन कापून करण्यात आले.या शिबिरात महाविद्यालयातील कर्मचारी रा . से . योजनेतील सर्व विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी प्रा . दत्ता साबले तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी एम . के . शाक्य , ए.व्ही मगरे , राजु पगारे , गुलशन शेख यांनी मोलाचे योगदान दिले.या शिबिराच्या
यशस्वीतेसाठी क्रिडा संचालक संचालक प्रा.डॉ. अजय बड़े सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा . डॉ . संजय शिंदे , प्रा . विकास बेळगे , गणेश करंगळ ,दिनेश ससाणे ,आरेफ शेख, सय्यद फेरोज , शेख शरीफ , ओम नवपुते , बलय्या सर ,अशोक नवपुते आदींनी प्रयत्न केले .