Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

भरपाई द्या ; अन्यथा जलसमाधी घेऊ चिंचाळा येथील शेतकऱ्यांचा इशारा



विहामांडवा /प्रतिनिधी


 ' अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून , सरकारने पैठण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा . मागच्या वर्षीचा अतिवृष्टीचा राहिलेला दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी द्यावा ; अन्यथा जायकवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा चिंचाळा येथील शेतकरी विजयसिंग बोडखे पाटील यांनी दिला आहे . ' मी माझ्या शेतात चार एकर शेतात कापसाची लागवड केली होती . 

पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने पिकांची चांगली वाढ झाली होती . मात्र , सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाल्याने माझ्या शेतातील कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . सध्या , चार एकर पैकी केवळ दहा गुंठ्यांतील पीक सुरक्षित असून आता लागवडीचाही खर्च निघणे मुश्किल झाला आहे .

अशी प्रतिक्रिया शेतकरी विजयसिंग बोडखे यांनी दिली . यामुळे मी तहसीलदार साहेबाना निवेदन दिले आहे . ' मी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात , सगळीकडे अतिवृष्टी झाल्याने पैठण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा . व मागच्या वर्षीचा अतिवृष्टीचा राहिलेला दुसरा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली आहे . मागण्या पूर्ण न झाल्यास मी जायकवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे , ' असेही बोडखे यांनी सांगितले .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.