Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

आमदार रोहीत पवार यांचे पैठण येथे जंगी स्वागत




विहामांडवा / प्रतिनिधी

दि.२३ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ८:३० वाजता
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तरुण तडफदार आमदार रोहितदादा पवार हे काल शनिवार रोजी श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर श्रीक्षेत्र पैठण येथे दर्शन व आरतीसाठी आले असता  सह्याद्री नाका, खंडोबा मंदिरमार्गे नाथ मंदिर परिसरापर्यंत माजी आमदार संजय पाटील वाघचौरे व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष विशाल संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली  काढण्यात आली. आमदार रोहीतदादा पवार हे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या बुलेटवर बसले व भव्य मोटार सायकल रँली निघाली खंडोबा मंदिर परिसरात आमदार रोहीतदादा पवार यांचे क्रेनद्वारे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. 

यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, जिल्हाउपाध्यक्ष विलासभैय्या शेळके, विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ. गुलदाद पठाण, शहराध्यक्ष तथा नगरसेवक जितू परदेशी, न प गटनेते कल्याण भुकेले,  नगरसेवक बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, शहरकार्याध्यक्ष बब्बू फुलारी, अनिल हजारे, उमेश पंडुरे, ॲड सुभाष खडसन, विष्णुकांत मुंदडा, राजू बोंबले, तौफिक धांडे, महेंद्र साळवे, गौरव आठवले, सतिष सर्जे, फेरोज खान आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वागत केले. 
नंतर नाथ मंदिर समाधी स्थळ येथे जाऊन आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संस्थानच्या तसेच नाथ वंशज यांच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी गणेश शेळके, राजु शेख, शिवाजी घोडके, भगवान कुमावत, रामदास थोटे, ज्ञानेश्वर कागदे, नाना पा. मोरे, प्रा सुमित मुळे, महेश भोसले, शेखर देशमुख,  काकासाहेब गलधर, पंढरीनाथ सोनवणे, दत्ता लोहगळे, राजु शिंदे, शिवाजीराव वाघचौरे, सुशील बोडखे, श्रीकांत तरमळे, अनिरुद्ध गोजरे, गणेश कणसे, दादा पा.मुळे, वसंत वाघचौरे, गजानन भांड, आकाश निर्मळ, रयस चाऊस, अनिल वाघचौरे, अश्विन परदेशी, गोरख घायाळ, शाहरुख पटेल, सचिन शेळके, सतिश कानुले, अमोल जाधव, राजु माडेकर, वैभव वाघ, आकाश शेळके, अभिषेक तांगडे, सोमनाथ चेमटे, साईनाथ गरड, अमर दसपुते, धोंडीराम घोरपडे, अशोक थोरात, मयुर लांडगे, शिवा पाचफुले, शुभम छडीदार, सुजित दानोले, राम भुकेले, अनिल लिंबोरे, सुदर्शन बल्लोज, आप्पा जाधव यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.