Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०३, २०२१

वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या - लायकराम भेंडारकर

 वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या - लायकराम भेंडारकर

गोंदिया जिल्हा वारकरी साहित्य परिषद



संजीव बडोले प्रतिनिधी

नवेगावबांध दि.3 सप्टेंबर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी घोषीत केल्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील  वारकरी संप्रदायातील किर्तनकार,प्रवचनकार, गायक,वादक,टाळकरी अशा विविध कलावंताना शासनाने त्वरीत आर्थिक मदत करावी. अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री यांचे नावे असलेले निवेदन आज ( ता.2 ) तहसिलदार अर्जुनी मोर. यांना देण्यात आले. 

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार  देशात गेल्या दिड वर्षापासून कोरोणा महामारी चे संकट ओढावले आहे. देशात सततच्या लाॅकडाऊन मुळे शेतकरी, शेतमजुर, लहान उद्योग धंदेवाले तसेच कलेवर उदरनिर्वाह असणा-या कलावंतावर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.  लाकडाऊन मुळे समाजातील सर्वच घटकातील लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी संप्रदायातील विवीध कलावंतानाही बसला आहे.वारकरी संप्रदायातील लोक समाजात  धार्मिक उपक्रम  ,अखंड हरिणाम सप्ताह,पारायण सोहळे  प्रदिर्घ काळापासून बंद असल्यामुळे  कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार कलावंताना आर्थिक मदत देण्यात यावी. असी मागणी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी वारकरी साहित्य परिषदेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष लायकराम भेंडारकर,मोरेश्वर मेश्राम, योगेश शिवनकर, पुंडलिक बारशे महाराज,  मोतीराम भेंडारकर महाराज, एकनाथ ठलाल महाराज, केशव फुंडे महाराज,प्रामुख्याने उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.