Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१

भन्नाट आयडिया : टॉयलेट मध्ये माशी बसवल्याने साफ करण्याचा खर्चात बचत

 भन्नाट आयडिया : टॉयलेट मध्ये माशी बसवल्याने साफ करण्याचा खर्चात बचत


भारतातील विविध सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये जाऊन तुम्हाला समजले असेल की, लोक शौचालयात खूप घाण करुन ठेवतात. मग स्वच्छता करणाऱ्या लोकांनी त्याला कितीही साफ केलं किंवा कितीही मेहनत घेतली तरी, शौचालय घाणच राहातं. यावरती पर्याय म्हणून काही देशांनी यावर विचार केला आणि त्यावर एक युक्ती सुचवली, ज्यामुळे त्यांचे खूप पैसे वाचले आणि दरवर्षी ते त्यांच्या खर्चात मोठी बचत करण्यात यशस्वी झाले. हे शक्य झालं ते छोट्या माशीच्या मदतीने.


तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? माशी कसं काय हा खर्च वाचवत असेल? नक्की हा प्रकार तरी काय आहे? तुम्हाला जर यामगची कल्पना सांगितली, तर तुम्ही देखील या कल्पनेचं कौतुक कराल. ही कल्पना ऐकायला कशीही वाटत असली तरी, ती यशस्वी ठरली आहे.


अलीकडेच एक अहवाल समोर आला आहे, ज्यात असे सांगण्यात आले आहे की, ही कल्पना अ‍ॅम्सटरडॅमच्या विमानतळावर आखण्यात आली होती आणि परिणामी विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा खर्च 8 टक्क्यांनी कमी झाली आहे. होय, आता विमानतळाला शौचालय स्वच्छ करण्यासाठी खूप कमी खर्च येतो. अशा परिस्थितीत जाणून घ्या की कल्पना नक्की आहे तरी काय? आणि त्यामुळे शौचालयाच्या स्वच्छतेचा खर्च कसा कमी करता येतो

काय आहे कल्पना

अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी शौचालयाच्या भांड्याचाय आता माशी बनवली जाते. म्हणजेच त्यावर माशीचे 3D सारखे स्टिकर लावले जाते, ज्यामुळे लोकं घाण कमी करतात.

वास्तविक, ही कल्पना फक्त पुरुषांच्या शौचालयात वापरली गेली आहे. जेव्हाही एखादी व्यक्ती लघवी करायला जाते तेव्हा त्याला लघवी करण्याच्या भांड्यात एक माशी दिसते आणि मग त्याचे लक्ष्य त्या माशीकडे जाते. ज्यामुळे मानवी वृतीप्रमाणे व्यक्ती त्या माशीला टार्गेट करतो. म्हणजेच, तो लघवीने करत असताना त्याच्या लघवीची धार त्यामाशीवर ठेवतो आणि माशीला तेथून उडवण्याचा प्रयन्त करतो.

यामुळे होते काय की, पुरूष आजूबाजूला घाण न करता, त्या भांड्यातच लघवी करतात, यामुळे साफसफाईचा खर्च कमी झाला आहे.

ते कोठे सुरू झाले

हे सर्वप्रथम अ‍ॅमस्टरडॅमच्या विमानतळावर हा एक्प्रिमेंट सुरू करण्यात आला. विमानतळावरील प्रत्येक लघवीच्या भांड्यात एक माशी लावण्यात आली. या प्रयोग सक्सेस झालेला पाहून यानंतर ही कल्पना अनेक कंपन्या, संस्था आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वापरली गेली आणि यामुळे साफसफाईच्या खर्चाची मोठी बचत होत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.