Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०३, २०२१

27 वर्षानंतर चंद्रपुरात पार पडली रॅपिड बुद्धिबळ विदर्भस्तरीय स्पर्धा



चंद्रपूर -  येथील क्रिएटिव्ह चेस असोसिएशन व चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवार(28 ऑगस्ट)ला विदर्भस्तरीय बुद्धिबळ रॅपिड (vidarbha Rapid Chess Championship) स्पर्धेचे आयोजन चं. श्र.प. संघाच्या वतीने करण्यात आले.दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया,यवतमाळ व वर्धा येथील किमान 120 खेळाडूंनी सहभाग घेतला.

सायंकाळी पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानी जैन  बलकर्सचे संचालक राजेश जैन यांची तर अतिथी म्हणून पत्रकारसंघाचे अध्यक्ष मजहर अली,जेष्ठ पत्रकार बाळ हुनगुंद,प.संघाचे उपाध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर,सचिव बाळू रामटेके,सुनील तायडे,देवानंद साखरकर यांची उपस्थिती होती.

यावेळी झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मनोज कळसे, द्वितीय सिद्धांत पिठ्ठल वार, तृतीय सुदर्शन महिंद्रा यांनी विजय मिळविला तर 17 वर्षाखालील वयोगटात संघर्ष आवळे (प्रथम) तर द्वितीय क्रमांकावर निहान पोहाणे हे विजयी ठरले. मुलींसाठी झालेल्या खुल्या गटात शुभमीस्ता साहू, यशस्विनी अनाम, 14 वर्षाखालील गटात निर्माण पोहाणे ,सार्थ भुजाडे ,संगम चव्हाण यांनी तर 14 वर्षाखालील मुलींच्या गटात त्रिशा कोंडागुरले, मोदीका महांद्रा यांनी पुरस्कार मिळाला युवा गटात गटात निराला जैन यांनी तर नव वर्षा खालील वयोगटात स्मित पत्तीवार, जिग्नेश आदिया, मुलींमध्ये मेधा चौधरी हे पुरस्काराचे मानकरी ठरले. अकरा वर्षाखालील गटात सक्षम चेडे, संघात कळसे यांनी पुरस्कार मिळविला.चमूकल्यांसाठी झालेल्या 7 वर्षाखालील गटात दर्शित जैन, रेहांश खोटे, निता पाटील, मायेशा पटेल यांनी तर अठरा वर्षाखालील गटात सुनिधी  निर्वाण हे पुरस्काराचे मानकरी ठरले.जावेद साबीर,हर्ष डोयाल,लावण्या कष्ठी यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.यावेळी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन क्रिएटिव्ह चेस असो.चे जिल्हाध्यक्ष अश्विन मुसळे यांनी केले तर प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.परीक्षक म्हणून निलेश बांदे यांनी भूमिका बजावली. यशस्वितेसाठी सूरज जयस्वाल, अदनान साबीर,नयन रामटेके,साहिल गोरघाटे,अशीत रामटेके,आयशा मेहमूद,तानीया महमूद,कार्तिक मुसळे व नरेंद्र लाभणे यांनी परिश्रम घेतले.

पालकांचा उत्साह बघण्यासारखा

कोरोनामुळे सर्व कैद झाले होते.पण,या बुद्धिबळ स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला.पालकांनी आपल्या पाल्यासाठी पूर्ण दिवस खर्ची घातला.आयोजकांनी बाहेरून आलेल्यांसाठी वेळीच,राहण्याची व्यवस्था केली.पालकांचा उत्साह बघण्यासारखा होता.


vidarbha Rapid Chess Championship


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.