दोघांना मिळणार दृष्टी
नागपूर : अपघातात डोक्याला जबर मार बसून उपचारादरम्यान ब्रेन डेड झालेल्या पतीच्या अवयवदानासाठी या दुखा:तही पत्नीने व मुलाने पुढाकार घेवून समाजापुढे आदर्श ठेवला.
ब्रम्हपूरी (जि. चंद्रपूर ) येथील दयानंद सहारे या शिक्षकाचे नागपूरात सोमवारी अवयवदान करण्यात आले. त्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे अवयवदान सप्ताह मधील हे अवयवदान मोलाचे ठरले आहे.
अवयवदात्याचे नाव दयानंद सहारे (वय५८ रा. ब्रम्हपूरी) असे आहे. ते पेशाने शिक्षक होते. रस्ता अपघातात ते जबर जखमी झाले होते. त्यांना नागपूरमधील विम्स हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ब्रेन डेड झाल्याचे डाँक्टरांनी घोषित केले. डाँक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला सहारे कुटुंबियांना दिला होता.
पत्नी वनिता,मुलगा भुपेश ,पुतण्या डाँ. चंद्रकांत सहारे यांनी या दुखा:त सावरत आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्याकरिता अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
मूत्रपिंड व यकृतासाठी ग्रीन काँरिडोर
सहारे यांचे एक मूत्रपिंड न्यू इरा हाँस्पिटल तर एक मूत्रपिंड वोक्हार्ट हाँस्पिटल मधील रुग्णालयाला दान करण्यात आले. वहातूक पोलिसांनी ग्रीन काँरिडोर करुन काही मिनिटात हे अवयव रुग्णालयापर्यत पोहचविले. सहा तासात प्रत्यारोपण ही पार पडले. यकृत एका खाजगी रुग्णालयास तर दोन्ही बुबुळ एका नेत्र बँकेस दान करण्यात आले. सहारे कुटुंबियांनी हृदयदान करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यासाठी चेन्नई येथील एमजीएम हेल्थ केआर हाँस्पिटलची टिम नागपूरात दाखल झाली होती. परंतु प्रत्यारोपणासाठी हृदय चांगल्या स्थितीत नसल्याने पुढील प्रक्रिया थांबवली. विम्स हाँस्पिटलमधील डाँक्टरांनी दयानंद सहारे यांना मानवंदना दिली.
teacher Weldone save life