Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ३०, २०२१

दक्षिण-पश्चिम विधानसभेत मनसेची मोर्चेबांधणी सुरू: महिला सेना पदाधिकारी आणि नवीन शाखा अध्यक्षांची नेमणूक



महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात मनसेचे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष श्री अजय ढोके व मनसे महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सौ. संगीता सोनटक्के (सहारन) यांच्या हस्ते पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.

दक्षिण- पश्चिम विधानसभा महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा पदी श्रीमती रचना गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शाखा अध्यक्षा पदी  सौ. वैशाली फुलझेले, लोखंडेनगर, व सौ. सविता मानकर, त्रिमूर्ती नगर आणि  शाखा सचिवा पदी सौ. स्वाती चौरवार व सौ. अनु सहारे यांची नियुक्ती करण्यात आली.

श्री उत्तम रागीट, सोमलवाडा, श्री साहिल बेहरे, मेहेर कॉलनी, श्री नंदू गेडाम, गोपालनगर, श्री प्रशांत हुड, माधव नगर यांची शाखा अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.

मा. राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले जन हितार्थ काम आपल्या प्रभागात करा असा सल्ला प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना दिला व सांगितले की, येत्या काळात लवकरच मा. राजसाहेब ठाकरे आपल्या भागात दौऱ्यावर येणार असून पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहे. संघटन वाढीवर भर द्या असे सांगत नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलतांना शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी सांगितले की, मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि मनसैनिक यांनी येणाऱ्या मनपाच्या निवडणुकी लक्षात घेता जोरदार तय्यारी करावी, जनतेची कामे नेहमीप्रमाणे करीत रहा, जनतेचा   मनपात सत्तेत असलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींवरचा  विश्वास उडाला आहे. यावेळी जनता नक्कीच मनसेला मतदान करून आशीर्वाद देईल असा विश्वास व्यक्त केला.

मनसेची महिला सेना जास्तीत जास्त संख्येने निवडणूक लढवेल असा निर्धार महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सौ संगीता सोनटक्के ( सहारन) यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केला.

याप्रसंगी दक्षिण - पश्चिम विधानसभा क्षेत्राचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री विभाग संघटक सागर नान्हे, विभाग उपाध्यक्ष अमर काळे , अनिकेत दहीकर,सुभाष ढबाले,   शाखा अध्यक्ष मोहित हिरडे, शाखा अध्यक्ष अमेय पांडे, यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.