कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देशभरामध्ये लसीकरण सुरू आहे. जवळपास पन्नास टक्के नागरिकांनी आतापर्यंत लस घेतली असून, अनेक ठिकाणी लस घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. परदेशात आणि देशांतर्गत कुठेही फिरायचे असेल तर लसीकरण करणे आवश्यक झाले आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या विभागात लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. अशावेळी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. मात्र लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
आतापर्यंत कोविन पोर्टल, आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून कोरोणा लसीकरण सर्टिफिकेट काढता येत होते. मात्र आता भारत सरकारने व्हाट्सअप सोबत भागीदारी केली असून, कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया अत्यंत अत्यंत सोपी करण्यात आली आहे.
लसीकरणाचे प्रमाणपत्र हवे असल्यास ते कसे डाऊनलोड करावे ?
- आता आपण व्हाट्सअपच्या माध्यमातून करून बघूया
- सर्व प्रथम तर आपल्याला 9013151515 हा मोबाईल क्रमांक सेव्ह करावा लागेल.
- तो myGov covid नावाने सेव्ह करा
- फोन नंबर सेव केल्यानंतर तुम्ही व्हाट्सअपवर जा
- गेल्यावर आपण तो कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये शोधायचा, ज्या नावाने आपण हा नंबर सेव्ह केलेला आहे त्याच नावाने जर आपण हा मोबाईल क्रमांक शोधा
- सर्च करून ओपन करा आणि त्यानंतर चॅटबॉक्समध्ये डाऊनलोड सर्टिफिकेट download certificate असे इंग्रजीत टाईप करा
- पलीकडून तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी क्रमांक पाठवला जाईल.
- ओटीपी व्हेरिफाईड करून तो दाखल केला की आपल्याला व्हाट्सअपवर कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र लगेच उपलब्ध होईल.
प्रक्रिया सोपी आहे एकदा करून बघा!