*अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
: अखील भारतीय महिला न्याय एंव समाजोन्नती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश देशमुख यांचे सूचनेप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रमिलाताई लेडांगे भद्रावती यांचे नेतृत्वात महिला शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशन भद्रावती यांना शहरातील चालणारे खुल्लेआम जुगार व्यवसाय आणि अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातुन केली आहे .भद्रावती शहरात अवैध धंद्याला आणि जुगार व्यवसायाला उत आले असून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. घरातील पुरुष मंडळी सट्टा (मटका) जुगाराच्या आहारी जाऊन सतत जुगार खेडतो. या कोरोनाच्या काळात एक तर रोजगार उपलब्ध नाही, गरीब महिलां आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे. आणि घरातील पुरुष मंडळी (वरली मटका) जुगाराच्या नादी लावून शहरातील सट्टा व्यवसायिक जनतेची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहे. सध्या शहरात १४१ मटका पट्टीधारक असून त्यांचा एकमेव पुढारी खूप मोठ्या प्रमाणात अवैधरित्या माया जमवीत आहे. जुगाराची सवय झाल्यामुळे शहरात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. तसेच शहरात भंगार व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु असून या व्यवसायात चोरीचे सामान चोरी करून भंगार दुकानात विकले जात आहे. अशा या चालणाऱ्या अवैध धंद्यांना ऊत आला असून भद्रावती पोलिसांकडून कारवाई मात्र काहीच नाही. यासाठी महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रमिलाताई लेडांगे भद्रावती यांचे नेतृत्वात महिला शिष्ट मंडळाने अवैध धंदे व शहरातील जुगार व्यवसाय त्वरित बंद करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रमिलाताई लेडांगे, मनीषा पुराणिक राज्य उपाध्यक्ष, सीमा लेडांगे विदर्भ उपाध्यक्ष, शालिनी महाकुलकर जिल्हाध्यक्ष, माया पटले जिल्हा उपाध्यक्ष, मनीषा जिवतोडे जिल्हा उपाध्यक्ष, वर्षा कालभूत तालुका अध्यक्ष, रेखा जाधव शहर उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.