स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत काल ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी निर्देश दिले आहे - त्यानुसार राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यात येतील. सध्या प्राथमिक स्तरावर मुंबई ,नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध होतील यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल म्हणजेच वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये जितके पैसे जमा असतील त्यानुसारच वीज वापरता येईल. तसेच मीटरमध्ये छेडखानी करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल त्यामुळे वीजचोरीस आळा बसेल, असे राज्य सरकारने सांगितले.
लाईट बिल बघणे
MSEDCL payment History
www.mahadiscom.in consumerportal quickaccess
MSEB bill
billcal.mahadiscom in/consumer bill/
Mahavitaran Electricity bill
Electricity bill View online
MSEB complaint
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, जुलै २१, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments