शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपध्दत
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) परीक्षा कोविड -१ ९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे.
तसेच शासनाच्या दि .२ / ७ / २०२१ च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इ .१२ वी ) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर केलेली आहे . त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील , सूचना व वेळापत्रक मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेले असून त्याची कार्यपध्दती तयार करण्यात आलेली आहे . त्यामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे शाखानिहाय नोंदणी केलेल्या नियमित , पुनर्परिक्षार्थी , नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी , तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांचे मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
तरी , सदर मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील , सूचना , मूल्यमापनाबाबतचे विषयनिहाय परिशिष्टे व वेळापत्रक इ.बाबतचे परिपत्रक व परिशिष्टे याची सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य व शिक्षक यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी.
शासन निर्णय व उपरोक्त परिपत्रकानुसार इ .१२ वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडीओ मंडळाच्या यु - टयुब चॅनेलवर http://mh-hsc.ac.in/faq या लिंकवर दि .०७ / ०७ / २०२१ रोजी स . ११.०० पासून उपलब्ध करुन दिलेला आहे .