Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै २२, २०२१

११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाईन आवदेनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे ४११००४

सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाईन आवदेनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 



२०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि .२१ ऑगस्ट , २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात आले आहे . या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि .२० / ०७ / २०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दि .२६ / ०७ / २०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात आली होती . तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आले आहे . सदर सुविधा पूर्ववत सुरु झालेनंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल . तसेच सदर परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी .




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.