रामटेक — तिर्थक्षेञ अंबाळा तलाव येथे दोन युवक मिञ बुडून मुत्यृ झाल्याची घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर माहीती अशी की नागपूर रविनगर परिसरातील बारावी सोबत शिकत असलेले सहा मिञ निसर्ग प्रभाकर वाघ , कृणाल अशोक नेवारे , अभिनव जिचकार , प्रणय वासनिक , तन्मय कुंभारे ,लक्ष्मीकांत बबडीलवार, हे कार क्रमांक एम एच ४३ - बीपी ५६०८ गाडी ने रामटेक कडे फिरायला आले .त्यांनी अंबाळा तलाव मार्गा कडे जात असतांना सद्या कोरोना संक्रमना मुळे तिर्थक्षेञ अंबाळा तलाव परिसर प्रवेश बंदी करण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रवेश बंदी बंदोबस्त होमगार्ड लावण्यात आले असुन त्यांनी त्यांना प्रवेश करु दिला नाही. या युवकांनी रस्ताच्या कडे ला गाडी लाऊन पहाडी मार्गाने अंबाळा तलावाकडे प्रवेश केला तलावात आंघोळ करण्याकरीता चार मिञ तलावात उतरले व आंघोळ करीत असतांना निसर्ग आणि कृणाल व दोन मिञ आंघोळ पाण्यात उतरले पण यात निसर्ग व कुणाल बुडायला लागले दोघांना आपला बचाव करण्यात यश आले. या चार युवकांना पोहता येत नव्हते तर दोन मिञ वर बसले होते . या परिसरामध्ये कोरोनामुळे बंदी गर्दी लोंक नसल्यामुळे त्यांना मदत करणारे नसल्यामुळे दोन युवकांना बुडून मुत्यृ झाले . घटनेची माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी स्थानिक मासेमारांच्या साह्याने शोध करुन तलावातुन निसर्ग याचा मुत्यदेह मिळाला असुन कृणाल चा शोध सुरु आहे .या शोध मोहीमेत स्थानिक मासेमार व राज्य आपत्ती प्रतिसाद दल ( रेस्क्यू टिम ) शोध करीत आहे. पोलीस निरिक्षक मकेश्वर , एपीआय शेंडगे , घटना स्थळावर दाखल असुन प्राथमिक तपास शिवाजी बोरकर , शिपाई संतोष मारबते करीत आहे.