Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०८, २०२१

वाघाची शिकार : दोन जणांना अटक

सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव  येथे वाघाची शिकार झाली होती. या प्रकरणी दोन जणांना वन विभागाने अटक केली आहे. आरोपीकडून ११ नखे, मिशांचे १६ केस, चार हाडे व चार लहान दात जप्त करण्यात आले. नागेंद्र किसन वाकडे व सोनल अशोक धाडसे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना चार दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तारे, सहायक वनसंरक्षक बोंगाळे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड, ब्राम्हणे आदी करित आहेत.



जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू 

            

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र-1 मध्ये 5 जून रोजीच्या विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता वाघिण मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच घटनेच्या स्थळी भेट देऊन चौकशी केली. तद्नंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या एसओपी नुसार दि. 5 जून 2021 रोजी प्राथमिक उपचार केंद्र, चंद्रपूर येथे शवविच्छेदनानंतर सदर वाघिणीचे दहन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्राथमिक तपासणीनुसार,या वाघिणीचा मृत्यू शरीरातील अंतर्गत जखमांमुळे झालेला असल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, ही वाघीण २ जून रोजी दुपारी डोणी-1चे वनरक्षक यांच्या नियमित गस्तीमध्ये डोणी गावापासून अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर दाट झुडूपाखाली बसून असल्याचे दिसून आले होते. ही वाघीण न उठल्याने तिच्यावर दि.2 ते 5 जून या कालावधीत विशेष निरीक्षण ठेवण्यात आले होते. सदर वाघिणीने दि. 3 जून 2021 रोजी जलद बचाव पथकावर हल्ला केला होता. त्यानंतर दि.5 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता सदर वाघिण हि मृतावस्थेत आढळली. याबाबतची संपूर्ण कार्यवाही चंद्रपूर,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपसंचालक (बफर) व सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असल्याची माहिती चंद्रपूर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद यांनी दिली.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.