Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २०, २०२१

माझे आई ,बाबा कधी घरी येणार ?



*मतिमंद मुलाची हाक;
कोरोनामुळे झाले वडिलांचे निधन

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: कोराना च्या दुसऱ्या लाटेत पित्याचे छत्र हरपलेल्या एका मतिमंद मुलाची दररोज एकच हाक असते ती म्हणजे माझे आई ,बाबा घरी कधी येणार या शब्दाचे उत्तर आईजवळ नसल्याने मुलांची समजूत कशी काढणार हा प्रश्न त्या मातेसमोर पडला आहे.
कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असेच उदाहरण म्हणजे भद्रावती येथील आहे कवडू अराडे वय 47 वर्ष राहणार विजासन भद्रावती यांचे दिनांक 29 एप्रिल ला कोरोनामुळे निधन झाले . कवडू हे वेकोलि येथे कार्यरत होते त्यांना एक मुलगा व एक मुलगी पत्नी असा परिवार आहे सतरा वर्षाचा मुलगा असून तो जन्मताच मतिमंद आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर ते प्रेम करायचे तो सुद्धा आई वडीला सोबत नीटनेटका बोलत असल्याने त्याला इतर मतिमंद विद्यालयात सुद्धा पाठविण्यात आले नाही त्याची संपूर्ण देखभाल करायचे .तो नेहमी आई-वडिलांच्या प्रेमातच राहायचा दिनांक 29 एप्रिल ला कवडू यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथील वेकोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी प्रवीण सुद्धा त्याच्या सोबत होता. वडीलाची प्रकृती बिघडली असल्याचे त्याला ठाऊक होते . त्यातच एका दिवसानंतर वडिलांचे निधन झाले त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा बाहेरच करण्यात आला. घरात मुलगी आई व आजी राहत असल्याने आईची प्रकृती सुद्धा ठीक राहत नाही त्यातच प्रवीण हा मतिमंद असल्याने या परिवारावर डोंगर कोसळला आहे.
निधनाला दीड महिना लोटला असताना प्रवीण हा दररोज आजीला ,आईला बाबा घरी कधी येणार त्यांना फोन लावा नाहीतर आपण त्याला घेऊन येऊ असे सतत तो तगादा लावत असतो त्याच्या या बोलण्यामुळे नेहमीच रडू येते त्याची समजूत घालून दिवस काढण्याचा प्रयत्न अराडे परिवार करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.