Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ११, २०२१

विविध चोरीतील चोरटे पोलिसांच्या ताब्यात

विविध चोरीतील चोरटे पोलिसांच्या ताब्यात
वाडी पोलिसांची यशस्वी कामगिरी
नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
शासनाच्या दिशा निर्देशानुसार शहरात लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद होते त्यातच शहरातील गोडाऊन सुद्धा बंद असल्याने याचा फायदा घेत गोदाम फोडून विविध सामानाची चोरी करणारे तसेच शहरात अवैधरित्या दारू विकणाऱ्या आरोपींना वाडी पोलिसांनी मुद्धेमालासह आरोपींना अटक केली आहे. प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार आरोपी किरण कैलास गणवीर वय २२ वर्ष ,रा. सिद्धार्थ चौक आंबेडकर नगर ,वाडी याने ३ मे व ४ मे २०२१ रोजी जनता रोड लाईन ट्रान्सपोर्ट या बंद असलेल्या गोडाऊनच्या मागच्या भागातील लोखंडी ग्रील तोडून स्टॉयलॉजी कंपनीचे विविध रंगाचे टी शर्ट,प्रिया कंपनीच्या बनियान,सॅनट्रो कंपनी अंडरवीयर,रबरी बॉल,गमछे,विविध रंगाचे टॉवेल असा एकूण १५ हजार ४४५ रुपये किंमतीचा माल लंपास केला.नमूद गुन्ह्यातील आरोपीचा वाडी पोलीस शोध घेत असताना आरोपी किरण संशयास्पद स्थितीत आंबेडकर नगर परिसरात फिरत असतांना पोलिसांनी आवाज देताच पळायला लागल्याने त्याला विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांनी दिली. दुसऱ्या घटनेतील आरोपी मनोज विश्वनाथ गणवीर वय ३० वर्ष रा. बौद्ध विहार खडगांव रोड वाडी,आनंद श्रीपाद बर्मन वय ४३ वर्ष रा. खडगांव फेटरी ता. कळमेश्वर वाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप ढोके आपल्या सहकाऱ्यांसह खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना नमूद आरोपींना थांबवून त्यांची तपासणी केली असता सदर आरोपीजवळून देशी दारूच्या २० नग १८० एम एलच्या बॉटल व होंडा शाईन मोटार सायकल असा एकूण ५१ हजार २०० रुपयांचा मुद्धेमाल जप्त करून आरोपीस अटक केली असून पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे,उपनिरीक्षक अविनाश जायभाये,साजिद अहमद, पोलीस कॉन्सटेबल सुनील मस्के,पोलीस शिपाई हेमराज,प्रमोद,सतीश करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.