मनरापकासे ने केली जिल्हाधिकारी यांना मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेना, नागपूर तर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नागपूर परिवहन विभागातील सर्व चालक, वाहक व ईतर कर्मचारी यांचे तातडीने लसीकरण पूर्ण करण्याची मागणी जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांना करण्यात आली. मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी व नागपूर परिवहन विभागाचे अध्यक्ष श्री अजय ढोके यांच्या मार्गदर्शनात नागपूर मनरापकासे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले. मनसेच्या राज्य परिवहन कामगार सेनेने आपल्या निवेदनात सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,नागपूर विभागात मोठ्या संख्येने कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत तर काही कर्मचारी यांना कोरोनाने आपले प्राण गमवावे लागले आहे. अश्या बिकट परिस्थितीत सर्व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे. सरकारच्या लसीकरण मोहिमेत लसीच्या तुटवड्यामुळे अनेक 45 वर्षे वरील कर्मचारी अजून लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सध्या 18 ते 45 वर्षे मधील लोकांचे लसीकरण थांबविले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे जास्तीत जास्त कर्मचारी हे 45 वर्षाआतील असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण रखडले आहे.
*राज्य परिवहन कामगार हा कोरोना काळात सातत्याने आपली सेवा देणार फ्रंट लाईन कामगार आहे त्यामुळे या कर्मचारी वर्गाचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे* याकरिता नागपूर विभागातील एस. टी. कर्मचारी यांना लस मिळण्यासाठी *बस स्थानक परिसराजवळ विशेष लसीकरण केंद्र अथवा एखादा दवाखाना* नेमून देण्यात यावा ज्याठिकाणी या कर्मचारी वर्गाचे प्राथमिकतेने लसीकरण पूर्ण करण्यात यावे जेणेकरून प्रवासी वर्गाला आपली सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
*एस टी चालक आणि वाहक आपली सेवा देतांना असंख्य प्रवाशांच्या संपर्कात सातत्याने येत असतो त्यामुळे कोरोनाचा धोका यांना अधिक प्रमाणात आहे ही जाणीव ठेवून शासनाने तातडीने आमची मागणी मंजूर करावी अशी विनंती केली आहे.*
*यासंदर्भात विभागीय नियंत्रक श्री निलेश बेलसरे यांची सुध्दा भेट घेण्यात आली व राज्य स्तरावर एस टी कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राथमिकतेने होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेनेचे अध्यक्ष श्री हरी माळी साहेब यांना निवेदन प्रत माहितीस्तव सादर करण्यात आली.*
मनरापकासे शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष *राम मांडवगडे*, उपाध्यक्ष *दुर्गा नंद बारई*, *अमित मंदुरकर*, यांचेसह *इतर पदाधिकारी* उपस्थित होते.