जिल्हाधिकारी पुणे यांना किसान सभेचे आठवण पत्र
जुन्नर /आनंद कांबळे
हिरड्याचे पंचनामे होऊन वर्ष उलटले पण नुकसान भरपाई नाही दिली म्हणून किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अँड .नाथा शिंगाडे यांनी आठवण पत्र दिले.
आदिवाशी समाजाला मदत करत असताना शासन किती उदासिन असते.म्हणूनच हेच आठवण पत्र दिले आहे,असे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले.
नुकतेच तौक्ते चक्रीवादळाने पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे.
आंबेगाव,जुन्नर व राजगुरुनगर तालुक्यातील आदिवासी भागात घरांबरोबरच येथील शेतकरी वर्गाचे मुख्य उत्पनाचे स्रौत असलेले बाळहिरड्याचे याही वर्षी नुकसान झालेले आहे.
प्रशासनाने या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधिताना तात्काळ मदत करावी अशी मागणी किसान सभेने या पत्रात केली आहे..
पण याचबरोबर एका अत्यंत गंभीर बाबीकडे मा.जिल्हाधिकारी यांचे संघटनेने या आठवण पत्रातून लक्ष वेधले आहे.. मागील वर्षी,राज्यात,जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,राजगुरुनगर या तालुक्यातील आदिवासी भागातील समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या हिरडा या वनउपज झाडाचे यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.
हिरडा या औषधी वनउपज फळाचा ऐन हंगाम असतानाच हे चक्रीवादळ झाल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते.या भागात खाजगी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हिरडा झाडे आहे.हिरड्याच्या उत्पनातून वर्षभर स्थानिकांचा गुजराना होत असतो.
हिरडा नुकसानीचे मागील वर्षी पंचनामे तालुका कृषी कार्यालयाने केलेले होते, व हे पंचनामे तालुका स्तरीय महसूल यंत्रणेने जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेकडे सुपूर्त केलेले होते.परंतु वर्ष होवूनही अद्यापही या आदिवासी भागातील शेतकऱ्याना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही.
एकट्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील, ४३ गावातील, सुमारे ३१९८ शेतकरी यांची नुकसान भरपाईची रक्कम ही सुमारे १४ कोटीच्या आसपास आहे.
सदरील विषयाच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने मागील वर्षभर सातत्याने प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरु आहे.परंतु प्रशासनाने मात्र अद्याप ही नुकसान भरपाई अदा केली नाही....कोविडच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील शेतकरी बांधवाना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
आदिवासी भागातील उपजीविकेचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच ही रक्कम सदरील शेतकरी कुटुंबाना मिळाल्यास या कुटुंबाची उपजीविका सुरक्षित होण्यास नक्की मदत होईल.नुकसानीचे पंचनामे होवूनही वर्ष उलटले तरी जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर, हे अत्यंत गंभीर आह्रे.याची दखल मा.जिल्हाधिकारी यांनी घेऊन,तात्काळ प्रलंबित नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीने केली आहे...पुणे जिल्हाधिकारी यांना हे आठवण पत्र किसान सभेचे जिल्हा अध्यक्षअॅड.नाथा शिंगाडे,सचिव डॉ.अमोल वाघमारेव जिल्हा समिती सदस्य,अशोक पेकारी राजू घोडे विश्वनाथ निगळे,अमोद गरुड,लक्ष्मण जोशी यांनी सादर केले आहे..