एक हात मदतीचा... शिंदे परीवार यांचा
भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांचा संयुक्त ऊपक्रम
शिरीष उगे (भद्रावती/वरोरा प्रतिनिधी) :
एक हात मदतीचा सदराखाली कोविड-१९ चा प्रादुर्भाव व मागील एक महिण्यापासुनची लॉकडाउनची परीस्थिती लक्षात घेता वरोरा व भद्रावती शहरातील गरजु ऑटोचालकांना भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या तर्फे धान्याची किट वाटप करुन सहकार्य करण्यात आले.
भद्रावती येथे यशवंतराव शिंदे महाविद्यालय व वरोरा येथे हनुमान मन्दिर परीसर, द्वारकानगरी येथे आज (दि.24) ला सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान धान्य किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, चंद्रपुर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विवेक शिंदे, वरोराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ते वसंताभाऊ मानकर, दत्ताभाऊ बोरेकर, जयंत टेमुर्डे, बाळू भोयर, पवन महाडिक, सुरज निब्रड, सतिश गिरसावळे, शुभम निखाड़े, हर्षल शिंदे, डॉ. जयंत वानखेडे, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. राजेंद्र साबळे, तेजस कुंभारे, बाळा उपलंचीवार, भद्रावती ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष कल्याण मंडल, उपाध्यक्ष विनोद कुमरे, सचिव कैलास साखरकर, कोषाध्यक्ष दिनेश बदखल, वरोरा ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष अरविंद तिखट, उपाध्यक्ष प्रमोद धोपटे, कोषाध्यक्ष बाबा खंडाळकर, आदी उपस्थित होते.
कोविड-१९ च्या दुस-या लाटेत राज्यात संचारबंदी सुरु झाली याचा फटका ऑटोचालकांवर पडला. व्यवसाय ठप्प झाला. उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला. याची दखल घेत भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवारतर्फे सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी शेकडोच्या संख्येत गरजु ऑटोचालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
कोविड-१९ च्या दुस-या लाटेदरम्यान सुरवातीपासूनच भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवारतर्फे निशुल्क कोविड सेंटर, निशुल्क ओपीडी, निशुल्क औषधी, मास्क, सॅनिटायजर, पीपीई कीट, आदींचे वाटप, हेल्पलाईन क्रमांकाद्वारे घरपोच रुग्णांवर उपचार, बेड व प्लाज्मा साठी जिल्ह्यातील रुग्णांना सहकार्य, आदी अनेक उपक्रम सातत्याने सुरु आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील हे सर्वोत्तम रूग्ण व मानवसेवेचे कार्य वरोरा-भद्रावतीत सुरु असल्याने शिंदे परीवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.