नवेगावबांध येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी
जेतवन बुद्धभूमी येथेही धम्मबांधवांचे तथागतांना अभिवादन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.28 मे:-
येथील प्रशिक बुद्ध विहारात, जगाला प्रज्ञा, शील, करुणा, पंचशील, अष्टांगिक मार्गाची देणगी देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती २६ मे ला वैशाखी पौर्णिमा निमित्त बुद्ध जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी धम्म ध्वजारोहन नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांच्या हस्ते सकाळी ८.०० वाजता झाले. यावेळी लहानुजी साखरे, विठोबा बडोले, राजेंद्र साखरे, भास्कर बडोले, दुर्योधन राऊत, देविदास बडोले, शितल राऊत, भिमाबाई सहारे, शेवंताबाई टेंभुर्णे अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लहानु साखरे यांनी तथागत गौतम बुद्ध,तर विठोबा बडोले यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. यावेळी धम्म बांधवांनी सामाजिक अंतर राखत तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.येथील पंचशील बुद्ध विहारात नंदकुमार उके यांनी धम्म ध्वजारोहण केले. यावेळी यशवंत शेंडे, हरिश्चंद्र लाडे, माधुरी उके, जगदीश सहारे, सुगंधा राऊत, सरगम शहारे प्रामुख्याने उपस्थित होते.येथील जेतवन बुद्धभूमी प्रकल्प येथे बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापक मानवटकर यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून, प्राध्यापक दिनेश जांभुळकर, ठाणेराव वैद्य,रेवचंद शहारे,उपअभियंता घुटके, आनंद जनबंधु,नरेश बडोले, धनराज राऊत, प्रकाश साखरे ,जागेश्वर शहारे, सूर्यभान वाघमारे, व्यवसाय मित्र परिवार व समाज बांधव उपस्थित होते.जयंती कार्यक्रमात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे यांनी मानले. कार्यक्रमात कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.