Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १९, २०२१

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय पदोन्नती संदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय पदोन्नती संदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा


जुन्नर/आनंद कांबळे

 मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा पदोन्नती मधील आरक्षणासंदर्भातील दिनांक ७ मे, २०२१ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे आदिवासी अधिकार,राष्ट्रीय मंचाचे पुणे जिल्हा समनव्य समिती सदस्य डॉ.संजय दाभाडे यांनी केली आहे.


 दिनांक ७ मे, २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारने, शासन निर्णय काढून,पदोन्नतीच्या आरक्षणाच्या 33 टक्के जागा रिक्त ठेवण्याचा, आधीचा निर्णय रद्द करून पदोन्नतीतील सर्व (१००%) पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचे निर्देश दिले आहेत.


 शासनाचा हा निर्णय अतिशय चुकीचा असून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. 


 यापूर्वी राज्य सरकारने,पदोन्नती मधील ३३% आरक्षित पदे रिक्त ठेवून, खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरणेबाबत शासन निर्णय काढण्यात आला होता. 


मात्र आता नवीन शासन निर्णय काढून सर्व पदे २५ मे २००४ च्या स्थितीनुसार सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यामुळे आता पदोन्नती ही आरक्षणानुसार नव्हे 

तर फक्त सेवाज्येष्ठतेनुसार मिळणार आहे. 


 या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती सह अन्य मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे.


 उच्च न्यायालयाने २०१७ साली दिलेल्या निर्णयानुसार पदोन्नतीत आरक्षण अवैध ठरविले होते. 

या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. यामुळे पदोन्नती रखडल्याने, राज्य सरकारने आरक्षणाशिवाय खुल्या प्रवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार १००% पदोन्नतीच्या कोट्यातील पदोन्नत्या देण्याचा निर्णय घेतला आहे. 



 यापूर्वी २० एप्रिल २०२१ ला शासन निर्णय काढून पदोन्नती कोट्यातील ३३% आरक्षित पदे रिक्त ठेवून, केवळ खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता.


आता त्यात बदल करून ७ मे रोजी पुन्हा एकदा सर्व पदे आरक्षणाशिवाय भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 त्यामुळे रिक्त ठेवलेली ३३% आरक्षित रिक्त पदे ही आता खुल्या सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत.


 या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे.अशी भावना मागासवर्गीय कर्मचारी वर्गात व अनुसूचित जाती-जमातीच्या सर्वसामान्य नागरिकांत निर्माण झालेली आहे.


शासनाने दि.७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द करून मागासवर्गीयांना ३३% आरक्षीत कोट्यातून बिंदुनामावलीनुसार व खुल्या प्रवर्गातून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नत्या देण्यात याव्यात दि.15 जून 2018 रोजी केंद्रसरकारच्या कर्मचारी विभागाने,

महाराष्ट्र शासनाला असे आदेश दिले होते की,मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण सुरू ठेवावे,या आदेशाची अंमलबजावणी न करता राज्य सरकारने 7 मे 2021 चा शासन निर्णय काढून मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी वर्गावर अन्याय केला आहे,तरी केंद्रसरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करून दि.7 मे 2021 चा शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी आम्ही आग्रही मागणी करत आहोत. वरील मागण्या आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पुणे जिल्हा समनव्य समिती ने मुख्यमंत्री यांच्याकडे   केल्या आहेत. या निवेदनात मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत वस्तुस्थिती व सविस्तर मागण्या विस्तृत व तपशीलवार मांडण्यात आल्या आहेत.. हे निवेदन आदीवासी अधिकार,राष्ट्रीय मंचाचे पुणे जिल्हा समनव्य समिती सदस्य डॉ.संजय दाभाडे,राजू घोडे, सोमनाथ निर्मळ, अशोक पेकारी, विश्वनाथ निगळे, लक्ष्मण जोशी, प्रा.संजय साबळे, प्रा.स्नेहल साबळे , सुनील कोरडे, संदीप मरभळ यांनी दिले आहे.... 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.