Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २७, २०२१

अखेर त्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

 

कोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडलेल्या 67 पत्रकारांच्या  कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये मदत मिळणार

अर्जांचा वेगाने निपटारा करण्यासाठी पत्रकार कल्याण योजनेची दर आठवड्याला बैठक घेण्याचा समितीचा निर्णय

Posted On: 27 MAY 2021 9:23PM by PIB Mumbai

 

कोविडमुळे जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासाची स्वतः दाखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालयाने 2020 आणि 2021 मध्ये महामारीत जीव गमावलेल्या पत्रकारांची सविस्तर माहिती गोळा करून त्यांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजने अंतर्गत मदत देण्याची विशेष मोहीम हाती घेतली.

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 26 पत्रकारांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजने अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला अमित खरेसचिवमाहिती आणि प्रसारण मंत्रालययांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली. 2020-2021 या वर्षांत केंद्र सरकारनेकोविडमुळे मृत्यू झालेल्या 41 पत्रकारांच्या कुटुंबांना अशा प्रकारची मदत केली आहे. आता ही मदत केलेल्या कुटुंबांची संख्या 67 झाली आहे. कोविडमुळे जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना समितीने सांत्वना दिल्या.

पत्र सूचना कार्यालयाने स्वतःहून कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या अनेक पत्रकारांच्या कुटुंबांशी संपर्क केला आणि त्यांना योजना आणि दावे दाखल करण्याविषयी मार्गदर्शन केले. समितीने आर्थिक मदतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा त्वरित निपटारा करण्याच्या उद्देशाने पत्रकार कल्याण योजनेची बैठक दर आठवड्याला घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड व्यतिरिक्त अन्य कारणाने मृत्यू झालेल्या 11 पत्रकारांच्या कुटुंबांनी मदतीसाठी केलेले अर्ज देखील समितीने विचारात घेतले आहेत.

पत्र सूचना कार्यालयाचे मुख्य महानिदेशक  जगदीप भटनागरसहसचिवमाहिती आणि प्रसारण मंत्रालयविक्रम सहायसमितीवरील पत्रकार प्रतिनिधी संतोष ठाकूरअमित कुमारउमेश्वर कुमारसर्जना शर्मा देखील या बैठकीला उपस्थित होते. 

पत्रकार कल्याण समिती अंतर्गत पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक मदतीसाठी पत्र सूचना कार्यालयाची वेब साईट https://accreditation.pib.gov.in/jws/default.aspx  च्या माध्यमातून अर्ज करू शकतात.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.