Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १८, २०२१

बिग ब्रेकिंग:चंद्रपूर जिल्ह्यात 21 एप्रिल पासून 'जनता कर्फ्यू

 





चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना जाहीर आवाहन 


चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ , स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या सुचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करणे याकरीता दिनांक 21 एप्रिल , 2021 ते दिनांक 25 एप्रिल , 2021 व दिनांक 28 एप्रिल , 2021 ते दिनांक 01 मे , 2021 या कालावधीत स्वयंस्फुर्तीने जनता कयूं पाळण्याचे दि . 18 एप्रिल , 2021 ला झालेल्या सभेत ठरविण्यात आलेले आहे . त्या नुसार   खालीलप्रमाणे सेवा सुरु राहतील असे आवाहन करण्यात येत आहे : 

सुरु राहतील : 1. दिनांक 21 एप्रिल , 2021 ते दिनांक 25 एप्रिल , 2021 व दिनांक 28 एप्रिल , 2021 ते दिनांक 01 मे , 2021 या कालावधीत खालील सेवा नियमितपणे अ ) सर्व दवाखाने व औषधी दुकाने , कृषी केंद्र व पशु खाद्य दुकाने , सर्व शासकीय कार्यालय , बँक , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना ( कार्यालयीन दिवशी ) . 

ब ) घरपोच सेवासह दुध वितरण , वर्तमान पत्र , एल.पी.जी. गॅस वितरण , पेट्रोल पंप व हॉटेल मधुन Delivery Boy व्दारे घरपोच सेवा सुरु राहील . 

क ) परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील . सोबत प्रवेशपत्र बाळगावे . 
2. दिनांक 21 एप्रिल , 2021 ते दिनांक 25 एप्रिल , 2021 व दिनांक 28 एप्रिल , 2021 ते दिनांक 01 मे , 2021 या कालावधीत वरीलप्रमाणे सेवा सुरु राहतील . त्या व्यतिरिक्त सर्व किराणा दुकान , भाजीपाला व फळे , सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना / दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील . 



टिप : - उपरोक्त कालावधीत वरील क्रमांक 1 मधील सुविधा सोडून चंद्रपूर जिल्हयातील सर्व पानठेला / चहा टपरी व हातगाडी , फुटपाथ वरील चायनीजसह इतर सर्व प्रकारची दुकाने / आस्थापना बंद राहतील . वरीलप्रमाणे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरीक / लोक प्रतिनीधी व इतर सर्व दुकानदार यांनी स्वयंघोषीत जनता कयूं पाळून नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे ही विनंती .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.