Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक - चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

 महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक 

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची टीका


 

 

राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार हे महावसुली आघाडी सरकार असून सध्या राज्यातील राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण ही अतिशय चिंतेची बाब आहेअशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी ठाणे येथे केली. आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था लिंबूटिंबू खेळाडूसारखी झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईकप्रदेश सरचिटणीस आ. रविंद्र चव्हाणभाजपा ठाणे शहराध्यक्ष आ.निरंजन डावखरेआ. संजय केळकरठाणे शहर संघटन चिटणीस साठेप्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटीलनगरसेवक ॲड. संदीप लेलेनगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं राजकारण सुरू होत नाही अशा लोकांच्या राज्यातच महिलांवर अत्याचार आणि खंडणी यासारखे गुन्हे घडत आहेत. महावसुली आघाडी सरकारच्या जोखडातून महाराष्ट्राला वाचविण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रातील जनता भीतीच्या छायेखाली असून लोक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

खंडणी घेणाऱ्या सरकारला समर्पण निधीचे महत्व काय कळणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.