Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

पाणी टंचाई निर्माण होणार नाही या दिशेने नियोजन करा – आ. किशोर जोरगेवार

पाणी टंचाई निर्माण होणार नाही या दिशेने नियोजन करा – आ. किशोर जोरगेवार



मनपा अधिका-यांशी बैठकअनेक महत्वाच्या सूचना

 चंद्रपूर :

                 इरई धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही दर उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हा आजवरचा वाईट अनुभव राहिला आहे. आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देने ही मनपाची जबाबदारी आहे. त्यामूळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पाणी टंचाई निर्माण होणार नाही या दिशेने उत्तम नियोजन करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना दिले आहे.

पाणी प्रश्नासह शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज गुरुवारी महानगर पालिका अधिका-यांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात बैठक घेत महत्वाच्या सुचना केल्यात. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण भालाधारे, शाखा अभियंता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विवेक ताम्हन, उप अभियंता विजय बोरीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंदारे आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक घरी मुबलक प्रमाणात पाणी पोहचेल याचे नियोजन मनपा अधिका-यांनी करावे असे निर्देश सदर बैठकीत आ. जोरगेवार यांनी दिले आहे. अमृत कलश योजनेचे काम कासव गतीने सुरु आहे. यावरही आमदार किशोर जोरगेवार यांनी असमाधान व्यक्त करत हे काम जलदगतीने पूर्ण करावे तसेच या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावीपाणी टंचाईग्रस्त भागात पाणी पूरवठा करण्यासंदर्भात योग्य उपायोजना करण्यात याव्यात अशा सूचना केल्या आहे.  चंद्रपूरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याकरीता मनपाने आवश्यक उपाययोजना कराव्यातकोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावीजानेवारी 2021 पासून बंद करण्यात आलेला आशावर्कर यांचा कोरोना कालावधीतील वाढीव भत्ता सुरु करण्यात यावाप्रधानमंत्री आवाज योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात यावा आदि सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे.  


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.