तक्रारदार हे शेतकरी असून दि. ०७.०३.२१ रोजी तक्रारदार हे शेतावर किटकनाशक औषधी मारण्याकरीता आपल्या मोटार सायकल क्र . एम.एन .३१५ / एडी ११५३ ने गेले.
त्यावेळी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील पोलीसानी त्याठिकाणी जुगाराचा खेळ खेळत असलेल्या इसमांवर छापा टाकुन जुगार खेळत असलेल्या इसमांची व त्यासोबत तक्रारदाराची शेताजवळ ठेवुन असलेली मोटार सायकल पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे घेवून गेल्याने तक्रारदार पो . स्टे . डुग्गीपार येथे जावून डोंगरगाव येथील बिट अमलदार संजय वडेट्टीवार , पोलीस हवालदार यांना भेटले . त्यावेळी तक्रारदार यांनी बिट अंमलदार श्री . वडेट्टीवार, पोलीस हवालदार यांना त्याची मोटार सायकल कशासाठी आणली , माझी मोटार सायकल मला परत करा , असे विचारल्यावर त्यांची मोटार सायकल जुगाराच्या गुन्हयात टाकली असून तुम्ही तुमची मोटार सायकल कोर्टातुन सोडवुन घ्या, असे सांगितले. त्यानंतर दि . १८.०३.२१ रोजी तक्रारदार यांनी मोटार सायकल सोडविण्याबाबत कोर्टात अर्ज केल्याचे सांगण्याकरीता श्री . वडेट्टीवार यांना मोबाईलवर संपर्क केला असता श्री वडेट्टीवार यांनी तक्रारदारास " तुला जुगाराच्या गुन्हयात अटकायचं नसेल व आपली मोटार सायकल सोडवायची असेल तर चुपचाप तू मला रू . २.००० / -दे " असे म्हटले . त्यावर तक्रारदार यांनी त्यांना रू . २,००० / - देवु शकत नाही , ते रू . १.००० / - ची व्यवस्था करू शकतात , असे बोलले असता श्री . वडेट्टीवार यांनी रू , २,००० / - दयावेच लागतील असे म्हणुन तक्रारदाराकडे रु .२,००० / - लाच रकमेची मागणी केली . त्यानंतर दि . २४.०३.२१ रोजी श्री . वडेट्टीवार यांनी मोबाईलवरून तक्रारदारास संपर्क साधुन रू . २,००० / - घेवुन पोलीस स्टेशनला ये , असे सांगितले , त्यावर तक्रारदार यांनी त्यांना ठिक आहे असे म्हटले . तक्रारदारास गै.अ. श्री . वडेट्टीवार यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी दि . २४.०३.२१ रोजी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
लाच मागणीच्या योग्य पडताळणीअंती आज दि . २५.०३.२१ रोजी कोहमारा चौकातील श्री . अग्रवाल यांचे हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर लाचेचा सापळा रचण्यात आला . या यशस्वी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी श्री . संजय उमाजी वडेट्टीवार वय ४६ वर्ष , पोलीस हवालदार / ७३ , पोलीस स्टेशन डुग्गीपार , जि . गोंदिया यांनी आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन तक्रारदार यांना जुगाराच्या गुन्हयात न अडकविण्याकरीता व त्यांची मोटार सायकल सोडण्याकरीता तक्रारदाराकडे रू . २,००० / - लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करुन ती लाच रक्कम रु २,००० / - पंचासमक्ष स्वत : स्वीकारली. त्यावरून आरोपीविरूध्द पो.स्टे . डुग्गीपार , जि . गोंदिया येथे अपराध क्र . ६२ / २१.कलम ७ ला . प्र.का. १ ९ ८८ ( सुधा.अधि .२०१८ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग , नागपूर चे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर , अपर पोलीस अधिक्षक राजेश दुधलवार , मिलींद तोतरे , यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे , , स.फौ शिवशंकर तुबळे , विजय खोब्रागडे , प्रदिप तुळसकर , ना . पो शि. रंजीत बिसेन , राजेंद्र बिसेन, नितीन रहांगडाले . सर्व लाप्रवि . गोंदिया यांनी केली