Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१

केंद्रीय शास्त्रज्ञाकडून तालुक्यातील करडी पिकाची पाहणी

केंद्रीय शास्त्रज्ञाकडून तालुक्यातील करडी पिकाची पाहणी


नागभिड तालुक्यात 360 एकरात करडी पिकाची लागवड

राहुल रामटेके
तळोधी/नागभिड
तेलवर्गीय पिकाची वाढती मागणी लक्षात घेता आपल्या परिसरात नविन पिक लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी नागभिड तालुक्यात 360 एकरा मधे करडी पिकाची लागवड कृषिअधिकारी व आत्मा, यांचे तांत्रिक मार्गदर्शनात रब्बी हंगामा मधे करण्यात आली आहे,
तालुक्यातील करडी पिक पाहणी दि. 6/2/2021 डाँ. प. दे.कृ.वि.अकोला येथिल कुलगुरू डाँ.विलास भाले, भारतिय तेलबिया संशोधन केंद्रांचे संचालिका डाँ.सुजाता मँडम, वरिष्टशास्त्रज्ञ डाँ.जवाहर लाल, डाँ.सतिश राव, यांनी प्रत्यक्ष तालुक्यात भेट देवुन करडी पिकाबाबत मार्गदर्शन केले.  
          यावेळी तालुक्यातील नवखळा येथिल शेतकरी सौ. कुंदा गंडाइत, तुकुम येथिल शेतकरी अशोक बनकर, जनकापूर येथिल शेतकरी तुळशिराम गायधने, आकापूर येथिल शेतकरी श्री भाकरे, यांचे शेतात प्रत्यक्ष भेट देवुन शेतकऱ्यांसोबत चर्चा करून अडचणिवर उपाय सुचविले, 
        .चंद्रपूर जिल्यातप्रथमच रब्बी हंगामामधे करडी पिक प्रात्याक्षिक , विभागिय कृषि सहसंचालक रविद्रं भोसले,नागपूर. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डाँ. उदय पाटील, चद्रंपूर, यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड करण्यात आली आहे.
        केंद्रिय चमुकडुन नागभिड तालुका पिक पाहणी प्रंसगी तालुका कृषि अधिकारी एन. व्ही.तपासकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक(आत्मा) जितेद्रं कावळे, कृषि सहाय्यक श्री चंदनशिवे,.श्री धुमाळ, श्री नवले, श्री मोहिते, श्री घुगे, श्री, दाडगे, शेतकरीमित्र राहुल रामटेके, आदी अधिकारी व शेतकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.