Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०५, २०२१

दांडपट्टा

दांडपट्टा.
मराठ्यांचं सर्वात आवडीचं हत्यार. याची भेदकता तलवारीहुन जहाल. उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही. मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते. पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे. खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो. 

पुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत, याला बेल्टप्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई, सय्यद बंडाला जिवा महालाने १६ हात लांबून कलम केले होते. छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो. म्हणजे तरबेज. मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते. तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला. 

मराठी हशमांमध्ये एक म्हण होती "धारकरी " म्हणजे जे व्यक्ती तलवार, भाला तीर कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना "धारकरी" गणले जायचे. अन् अजुन एक म्हण होती की "दहा धारकरी तर एक पट्टेकरी " यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते. पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते. त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फ़ुटाचा असतो. त्याचे पाते लवचिक असते. पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जावु शकतो. गर्दन देखील कटू शकते. पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फ़ुटांचा पोलादी घेर उभा करतो. 
यात प्रवेश केल्यावर साक्षात मृत्यूच. दोन्ही हातात पट्टा. घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो. याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुपट असते. याची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे याचे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची तलवारीपेक्षा क्षमता जास्त का ? मुख्य कारण आहे आपण तलवार फ़िरवताना सगळा जोर आपल्या मनगटातुन लावत असतो. पण प्रत्यक्षात पट्टा फ़िरवताना आपला पुर्ण हात आपला दंड, खांदे आणि विंग्ज चा भाग या सर्व अवयवांतूून ताकद लागलेली असते. पाते लवचिक असले तरी जर वार करताना पाते लपकले नाही. अन वार सरळ झाला तर सरळ एक घाव दोन तुकडे होतात...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.