Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १०, २०२१

वृत्तपत्र विक्रेता ते मुख्यमंत्री : दादासाहेब कन्नमवार


ओळख कर्तृत्वाची - 10

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 10 !!



दादासाहेब अगदी लहानपणापासून संघटक व्रुत्तीचे होते. कन्नमवार साहेब पहिल्यांदा फक्तं लोकमान्य हेच दैनिक विकत असले तरी नंतर स्वराज्य, तिलक, वंदे मातरम, यंग इंडिया, मराठी नवजीवन अशी अनेक पत्रक विकत होते. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते असहकार चळवळीचा प्रचार करीत होते आणि ज्यांची वर्तमानपत्र घेण्याची ऐपत नव्हती त्यासाठी चंद्रपूर येथील गांधी चौकात फळ्यावर देशातील घडामोडी लिहून लोकांपर्यंत संदेश पोहचवत होते .

परिस्तिथी जेमतेम असल्याने चंद्रपूर डिस्ट्रिक कौंसिलमधे रेकार्ड किपरची नोकरी स्वीकारली.16 डिसें.1924 ला कन्नमवार आपल्या कामावर रुजू झाले.एकीकडे नोकरी करावयाची आणि दुसरीकडे देशसेवा करावयाची असा हा दैनंदिन उपक्रम सुरू होता.

नोकरी करीत असतांनाही कन्नमवार चळवळीत भाग घेत होते. 11मार्च 1930 ला गांधीजींनी दांडी येथे मिठाच्या सत्याग्रह केला आणि देशव्यापी आंदोलन सुरू झाले. या कायदेभंगच्या वेळी कन्नमवार चंद्रपूर तालुका काँग्रेस कमेटिचे सेक्रेटरी होते.महात्मा गांधीच्या आदेशाप्रमाणे प्रभातपेऱ्या, सत्याग्रह, हरताळ इ.कार्यक्रम ते करारीपणाने पार पाडीत होते. *या हरताळमुळे त्यानां अटक करण्यात आली.शिवाय नोकरीवरून काढून टाकण्यात आले.* परंतू गांधी-इरविन करारानुसार 1931 मधे मुक्त झाले आणि त्यांची बडतर्फी रद्द होहुन ते आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले.

कन्नमवार चंद्रपूरच्या राजकारणात चांगलेच मुरले होते.काही सहकाऱ्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी गांधी सेवा मंडळांची स्थापना केली.

*1938 मधे ते नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटिचे सेक्रेटरी बनले. त्यानंतर ते नोकरी सोडून नागपूर ला राहू लागले. कन्नमवार नागपूरला राहत असले तरी त्यांचा बिऱ्हाड पाठीवरचं होते. एक पिशवी आणि त्यात त्यांचे चार दोन कपडे व प्रदेश काँग्रेस कार्यालय हेच निवासस्थान होते. अशी साधी राहणीमान दादासाहेबांचा होता.

1948 साली ते नागपूर प्रांतीय काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष झाले. अनेक प्रकारच्या संघर्षातून त्यांना जावे लागले.आत बाहेर चहूकडे सारखा विरोध असतांना ते टिकले आणि पुढे सरसावले.या संघर्षातून ते मंत्री नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.कर्माने वरच्या पातळीपर्यंत पोहचणारे कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार होते .

पेपर विकणारा मुलगा मुख्यमंत्री बनू शकते हा इतिहास पण शिकविण्यात यावा. त्यांचा जिवणचरित्रावर पुस्तक, लघु चित्रपट शासकीय स्तरावर उपलब्ध व्हावा. अशी मागणी सर्व संघटना मार्फत शासन दरबारी करायला पाहिजे.


खिमेश मारोतराव बढिये
प्रचारक (नागपूर)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.