Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २२, २०२०

कोरोना काळातील आशाताईंची सेवा चंद्रपूरकर विसरनार नाही किशोर जोरगेवार



भाऊबीज कार्यक्रम, आशावर्करने केले आ. जोरगेवार यांचे औक्षन                                                   

            कोरोनाच्या महासंकटात उल्लेखनीय कामगीरीतून ख-या कोविड योध्दा म्हणून ओखळ निर्माण करत कोरोनाच्या प्रादूर्भावार नियंत्रण ठेवण्यात महत्वाची भुमीका बजाविणा-या आशाताईंची सेवा चंद्रपूरकर कधीही विसरणार नाही. असे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवार यांनी केले.

            भाऊबीज निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशावर्कर यांनी आ. जोरगेवार यांचे औक्षण करुन दिर्घायुष्याची कामना केली. या कार्यक्रमात आशावर्कर यांना संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका *वंदना हातगावकर, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी नेत्या रंजना किन्नाके, वर्षा रामटेके, पौर्णिमा बावणे, प्रतिमा कायरकर, सविता गटलेवार, सुकेशनी शंभरकर, मीनाक्षी पाटील, कांता डांगे, संगिता गुरनले, प्रेमीला रणदीवे* आदींची उपस्थिती होती.

          


  यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, संकटकाळात आशावर्कर या संकट मोचक म्हणून समोर आल्यात. संसर्गजन्य रोग असलेल्या कोरोनाशी लढण्यात आशावर्कर यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे. कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने प्रतिबंधीत करण्यात आलेल्या क्षेत्रात स्वताचा जिव जोखीममध्ये टाकत आशाताईंनी सेवा दिली. कोरोना चाचण्या करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम आशाताईंच्या माध्यमातून करण्यात आले. परिणामी कोरोनाच्या प्रादुर्भाव नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. असे गौरोतगार यावेळी बोलताना आ. जोरगेवार यांनी काढले.  देशहितात काम करत असलेल्या आशाताईंची कोरोना काळातील सेवा ही चंद्रपूरकर आजीवर स्मरणात ठेवेल असेही ते यावेळी बोलले. हक्काचा भाऊ  म्हणून औक्षणाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केल्या बदल यावेळी आ. जोरगेवार यांनी आशाताईंचे धन्यवाद व्यक्त केले. आयोजीत या भाऊबीज कार्यक्रमात आशाताईंनी ओवाळणी केल्या नंतर भाऊ म्हणून आ. जोरगेवार यांनाही आशाताईंना भेट वस्तू दिल्यात यावेळी दिवाळी फराळ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.