जुन्नर /वार्ताहर
प्रधान मंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत खाते दाऱ्यांच्या आयकरामध्ये अपात्र झालेल्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करून तिचा भरणा जुन्नर स्टेट बँक शाखेत भरण्याकरिता 2 शासकीय कर्मचारी आलेले असताना 4 लाख 74 हजार रुपये ठेवलेली पिशवी बँकेच्या बाहेरून अज्ञात चोरट्यांनी चलाखीने लंपास केल्याची घटना जुन्नर मध्ये भर दिवसा घडली आहे
जावेद हुसेन मनियार रा बोरी ता जुन्नर यांनी या चोरीची फिर्याद जुन्नर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे ते महसूल विभागात कोतवाल म्हणून कार्यरत असून ते स्वतः व मंडल अधिकारी नितीन चौरे यांनी अपात्र शेतकऱ्यांकडून वसूल केलेली 4 लाख 62 हजाराची रोख रक्कम व 12 हजाराचा चेक घेऊन हे दोघेही स्टेट बँक जुन्नर मध्ये भरणा करण्याकरिता आले होते यावेळी तेथील बँक अधिकाऱ्याने तुमचे खाते तहसीलदार यांच्या पॅन कार्ड ला मॅच होत नाही असे सांगितले त्यानंतर मंडल अधिकारी तहसील कार्यालयात विचारणा करण्याकरीता गेलेले असताना कोतवाल हे बँकेच्या बाहेर एका बाकड्यावर बँक स्लीपा भरत बसलेले होते पैशाची पिशवी त्यांनी तेथेच बाजूला ठेवलेली होती बँक स्लीपा भरून झाल्यानंतर रोख रक्कमेची पिशवी तेथून लंपास झाल्याचे लक्षात आले या चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात नोंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे, पोलिस हवालदार नामदेव बांबळे करीत आहेत बँकेच्या ठिकाणी नेहमी वर्दळ असताना भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेबाबत व महसूल कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.