रोटरी क्लब ईशान्य निशुल्क करोना टेस्ट
# 302 आरटी पिसिआर (,RTPCR Test)
नमुने तपासणी
# सेवासदन शाळा येथे आयोजन
नागपूर/ काटोल : 21 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यात घेण्यात आला. शाळेत येणारे शिक्षकांची प्रथम कोविड- 19 आरटी पिसिआर टेस्ट शासनाने अनिवार्य केली होती. याचा लाभ जिल्हातील 302 शिक्षकांनी निशुल्क तपासणी रोटरी क्लब ईशान्य नागपूर यांचे सौजन्याने करण्यात आले. सेवा सदन झाशी राणी मेट्रो रेल्वे येथील शाळेत गुरुवार दि 19 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले. उदघाटन रोटरी क्लब ईशान्य अध्यक्ष योगेश टावरी,सचिव नरेश बलदवा, सुभाष राहोटी, संजय राठी, मनीष सावल,अनिस छाजेड, सौरभ गोयंका, नितीन राठी,संजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड टेस्ट करिता सेवासदन शाळा, सरस्वती विद्यालय,गजानन हायस्कूल,जिल्हातील लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महा विद्यालय, एल बी सिबीएसई स्कूल कोंढाळी आदी 8 (आठ) शिक्षसन संस्थांतील शिक्षक व कर्मचारीवर्ग आदींनी सहभाग घेतला. करोना टेस्ट करिता डॉ सागर नायडू, डॉ मंगल पुरी यांचे मार्गदर्शनात चमूने कार्य केले. दोन दिवसात टेस्ट रिपोर्ट सर्वाना मिळणार असल्याचे संजय राठी यांनी सांगितले. आयोजन संदीप अग्रवाल,हरीश राठी, नितीन गांधी, पोरजेक्ट मनीष सावल,संजय अग्रवाल, पियुष फटले पुरीया आदींचे सहकार्य लाभले