# हौशी योग असोसिएशनचे आयोजन
# गट निहाय पहिले तीन खेळाडू राज्य योग स्पर्धेकरिता पात्र
काटोल : करोना - 19 संक्रमण व प्रभावामुळे हौशी योग असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय ऑनलाईन लाईव्ह निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा झूम अँप द्वारे असून प्रवेश करून नोंदणी करावी असे संयोजक योगपटू सचिन वाळके यांनी कळविले आहे. स्पर्धेकरिता योग स्पर्धा पोशाख निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धकांना एकूण ५ आसने करावी लागतील.आसने लॉटरी पद्धतीने काढली जाणार आहे.स्पर्धकांची प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना निवड व *प्रमाणपत्र* देण्यात येतील. आणि निवडलेले पहिले प्रथम 3 स्पर्धक नोव्हेबर २०२० मध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.अधिक माहितीसाठी संपर्क
स्पर्धा प्रमुख तथा जिल्हा असोसिएशन पदाधिकारी सचिन वाळके 9850535570 , कविता वंजारी +91 95118 20692, धनश्री लेकुरवाळे +91 77092 24957,अंकिता गजबे+919309965316 यांचेशी संपर्क साधावा. स्पर्धा आयोजनाकरिता माधुरी मेघे,कु. धनश्री लेकूरवाळे, रवी रामटेके,
धनंजयी भोयर ,अंकिता गजबे , कविता वंजारी आदी परिश्रम घेत आहे.
स्पर्धकांचे अकरा वयोगट व जन्म तारीख याप्रमाणे प्रमाणित राहील. वयोगट 8 ते 10 वर्ष 31 डिसेंबर 2012 पूर्वी, वयोगट 10 ते 12 वर्ष जन्म 31 डिसेंबर2010 पूर्वी, वयोगट 12 ते14 वर्ष जन्म 31 डिसेंबर 2008 पूवी, वयोगट 14 ते 16 वर्ष जन्म दि 31 डिसेंबर2006, वयोगट 16 ते 18 जन्म 31 डिसेंबर 2004पूर्वी,वयोगट 18 ते21 जन्म 31 डिसें 2002 पूर्वी, वयोगट 21ते 25 जन्म
दि 31 डिसें 1999, वयोगट 25 ते 30 जन्म दि 31 डिसें1995, वयोगट 30 ते 35 जन्म 31 डिसें
1990, वयोगट 35 ते 45 जन्म दि 31 डिसें 1985, वय 45 नंतर खुला गट जन्म 31 दिसे 1975 पूर्वीचा असणे अत्यावश्यक आहे.स्पर्धा प्रारंभ नोंदणी झालेल्याच योगपटूंना वयोगटांनुसार तारीख व वेळ ग्रुपवर कळविण्यात येईल .स्पर्धा नोंदणी अंतिम तारीख दि. 16 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. करोना मुळे प्रथमच ऑनलाईन योग स्पर्धा आयोजित केल्या असून खेळाडूंचे नुकसान होऊ नये त्यांना राज्य स्पर्धेत सहभाग मिळावा याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.