चंद्रपूर, दि.15 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 199 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 12 हजार 945 वर पोहोचली आहे. 9 हजार 683 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 67 बाधितांवर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, रामपुर राजुरा येथील 80 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 7 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, दुसरा मृत्यू समाधी वार्ड, चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 ऑक्टोबरला श्वेता हॉस्पिटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्च रक्तदाब, मधुमेहाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल, चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 195 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 186, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 79 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर तालुक्यातील सात, मुल तालुक्यातील 41, कोरपना तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 18, नागभीड तालुक्यातील 20, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील सात, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील सहा, राजुरा तालुक्यातील सहा, तर गडचिरोली येथील दोन असे एकूण 199 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील रामनगर, बालाजी वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, गंजवार्ड, बाबुपेठ, जटपुरा गेट, तुकूम, छत्रपती नगर, सिंधी कॉलनी परिसर, नगीना बाग, इंदिरानगर, कृष्णा नगर, चिचपल्ली, गौतम नगर, मित्र नगर, विश्वकर्मा नगर, ऊर्जानगर, दुर्गापुर, महाकाली वार्ड, अंचलेश्वर वार्ड, विवेक नगर, सुभाष वार्ड, भिवापुर वॉर्ड भागातून बाधित ठरले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील विवेकानंद वार्ड, बामणी, बिल्ट कॉलनी परिसर, दूधोली, परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सोमनाथपूर वार्ड, चरडी, जवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड,बोर्डा, चैतन्य नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव,नान्होरी, बोडधा, फुलेनगर, तळोधी बाळापुर, टिळक नगर, खेड, समता कॉलनी परिसर, खरकाडा, शेषनगर, ज्ञानेश नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर, माजरी वस्ती परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सावली तालुक्यातील तेरोडा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील खैरी,मिनघरी,भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा, कानपा, गिरगाव,कोजबी, गांधी चौक परिसर, महात्मा चौक, आंबेडकर चौक परिसर, कोहाडी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, मालेवाडा, गुरुदेव वार्ड, चिखलापार, टीचर कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.मुल तालुक्यातील मारोडा, राजगड, जूनासुर्ला, चिखली, कारवा, राजोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.