Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०८, २०२०

चंद्रपूरात कोरोनाने एकाचा मृत्यू One death Corona in Chandrapur



चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या 833

466 कोरोना बाधितांना आतापर्यत डिस्चार्ज

364 कोरोना बाधितांवर उपचार सुरु

दुर्गापूर येथील 67 वर्षीय बाधिताचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 56 बाधित

चंद्रपूर,दि. 8 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 56 बाधितांची वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 833 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 466 कोरोना बाधितांना उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 364 बाधितांवर उपचार सुरू आहे. तर 6 ऑगस्ट रोजी दुर्गापूर येथील 67 वर्षीय कोरोना बाधिताचा सायंकाळी 7:30 च्या सुमारास मृत्यू झाला आहे. हा बाधित सारीचा रुग्ण होता. जिल्ह्यात आतापर्यंत 3 बाधितांचा मृत्यू झालेला आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर येथील 27 बाधित , बल्लारपूर तालुक्यातील 22 बाधित, ब्रह्मपुरी तालुक्यातील 5 बाधित, मूल तालुक्यातील 2 बाधित, वरोरा तालुक्यातील एका बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील 30 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील 40 वर्षीय महिला बाधित ठरली आहे. ही महिला सिकंदराबाद येथून परत आलेली होती. हवेली गार्डन येथील नागपुर वरून परत आलेला 30 वर्षीय युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून लालपेठ कॉलनी नंबर 1 येथील हेल्थ क्लब जवळील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. श्वेता रेसिडेंट येथील 48 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे. हा पुरुष नागपूर येथून परत आल्यानंतर गृह अलगीकरणात होता.

तुकुम चंद्रपूर येथील संपर्कातून 67 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगी, 62 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला तर 27 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे. पोलीस कॉलनी तुकुम येतील 22 वर्षीय युवती तर 74 वर्षीय महिलेचा अहवाल संपर्कामुळे पॉझिटिव्ह ठरला आहे. संपर्कातून इंदिरा नगर दुर्गा चौक येथील 64 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. सारीचा रुग्ण असणारा 58 वर्षीय बंगाली कॅम्प येथील पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे.

रामनगर कॉलनी येथील 40 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. संपर्कातून पुढे आलेल्या बाधितांमध्ये रामाळा तलाव येथील 26 वर्षीय युवक, मेजर गेट येथील 29 वर्षीय युवक, पठाणपुरा येथील 48 वर्षीय महिला, कुंदन प्लाझा येथील 35 वर्षीय पुरुष, जेटपुरा गेट रामनगर वार्ड येथील दहा वर्षीय मुलगी, जेटपुरा गेट येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नागपूर येथून परत आलेले बालाजी वॉर्ड गोपाल पुरी येथील 32 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

रामनगर सवारी बंगला पठाणपुरा येथील 57 वर्षीय पुरुष, श्याम नगर अयोध्या चौक येथील 26 वर्षीय युवक, जटपुरा वार्ड येथील 51 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. जीएमआर वरोरा येथील 27 वर्षीय युवक संपर्कातून बाधित ठरला आहे. मुल येथील कोल्हापूर वरून परत आलेला 27 वर्षीय, 33 वर्षीय पुरुष बाधित ठरले आहे.

बल्लारपूर आंबेडकर वार्ड येथील 53 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. संपर्कातून महाराणा प्रताप वार्ड येथील 30,61,19 वर्षीय पुरुष, 16, 20 व 22 वर्षीय युवती, 48 वर्षीय महिला पॉझिटिव्ह पुढे आले आहे. गोकुळनगर येथील 48 वर्षीय पुरुष, संतोषी माता वार्ड येथील 29 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय युवक, दहा वर्षीय मुलगा, 65 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरले आहेत. सर्दी, खोकला, ताप असणारे अनुक्रमे 47, 54, 62 वर्षीय पुरुष बाधित ठरले आहे.

बल्लारपूर श्रीराम वार्ड येथील 38 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव ठरला आहे.हा व्यक्ती गृह अलगीकरणात होता. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सुरभी चौक येथील 55 वर्षीय महिला बाधित ठरली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली येथील 17 वर्षीय युवक, 55 वर्षीय महिला संपर्कातून बाधित ठरली आहे. तर मांगली येथीलच संस्थात्मक अलगीकरणात असलेले 40 वर्षीय पुरुष तर 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. तर सुरबोडी तालुका ब्रह्मपुरी येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेला 36 वर्षीय पुरुषाचा अहवाल अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.