Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०९, २०२०

नगर अभियंत्यास नगरसेवकांची मारहाण




मूल (प्रतिनिधी)
अभियंता राठोड यांना मारहाण करण्यांचे घटनेसोबतच, महेंद्र करकाळे यांनी, नगर परिषदेचे अधिक्षक विलास कागदेलवार यांनाही मारहाण केल्याची आणि मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेशी बाचाबाची करून उध्दट उत्तरे दिल्याची तक्रार प्रसाद राठोड यांनी मूल पोलिसात दिली आहे. त्यांचे तक्रारीवरून मूल पोलिसांनी महेंद्र करकाडे यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून, उद्या (दिनांक 10) पासून नगर परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यांचा निर्णय नपच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघडण्याची शक्यता आहे.
प्रसाद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही कामे पेंडीग असल्यांने, प्रसाद राठोड हे नपत कामासाठी आले होते. ते परत निघत असतांना बाहेर नगर परिषदेचे सभापती विनोद सिडाम, प्रशांत लाडवे, नगरसेवक अनिल साखरकर उपस्थित होते.  विनोद सिडाम यांचेसोबत त्यांचे प्रभागातील कामाबाबत चर्चा सुरू असतांनाच, प्रभाग ७ ब चे नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी प्लॉस्टिकच्या खुर्चीने राठोड यांना मारहाण सुरू केले. शिवीगाळही दिली.  उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा वाद सोडविला.  यानंतर, करकाडे यांनी, नपचे विलास कागदेलवार यांनाही मारहाण केली, तर याबाबत माहीती घेण्यांचा प्रयत्‍न करणारे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेशी बाचाबाची करून, उदध्टपणे उत्तर दिले.
नगर अभियंता, हे नगरसेवकांचे न ऐकताच स्वमर्जीने कामे करतात, लोकांचा रोष माञ नगरसेवकांना सहन करावा लागतो.  यामुळे अभियंता आणि नगरसेवक यांचेत जुनाच वाद आहे. हा वाद अनेकदा नगर परिषदेच्या मासिक बैठकीतही दिसून येत होता.  हा वाद काल राञौ विकोपाला गेला आणि नगर परिषदेच्या आवारातच या अभियंत्यांना मारहाण केल्याची घटना घडली.ध्ये या दोनही नगरसेवकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी या घटनेचा निषेध केला आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.