दि.7 ऑगष्ट 2020 ला सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील आय.टी.आय.धारक बेरोजगार विद्यार्थ्यांनी गुरु रविदास फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे आय.टी.आय.धारक बेरोजगार विध्यर्थ्यानी मा. जिल्हाधिकारी साहेब,चंद्रपूर तसेच मा.आ.किशोर जोरगेवार (आमदार चंद्रपूर वि.) व मा.आ सुधीरभाऊ मुनगंटिवार (माजी वित्तमंत्री म.रा.) यांच्या मार्फत मा. ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब याना वरिल मागणीसह निवेदन दिले.
मागणीतील प्रमुख विषय- 1) उपकेंद्र सहायक पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफीकेशन पुर्ण करुन लवकरात-लवकर रुजू करने
2) विद्युत सहायक पदाची यादी प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबवून लवकरात-लवकर रुजू करने.
जुलै 2019 मध्ये महावितरण कंपनी ने विद्युत सहाय्यक पदासाठी 5000 जागा व उपकेंद्र सहाय्यक पदासाठी 2000 जागा या भरती प्रक्रिया साठी जुलै 2019 रोजी अर्ज मागवले होते. सदरील भरती माजी ऊर्जामंत्री बावनगुळे साहेबानी 45 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते परंतु एक वर्ष होत आल तरी ही भरती महावितरण ने राबवली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो आय टी आय बेरोजगार मुलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे मागच्या महिन्यात माननीय ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी महावितरण ला आदेश दिले की ही भरती प्रक्रिया 8 दिवसात पूर्ण करा. त्यात उपकेंद्र सहाय्यक ची यादी लावण्यात आली परंतु पुढील कार्यवाही होत नाही आहे.
आज 1 महिना झाला तरीही भरती होण्याची हालचाल दिसत नाही आहे तसेच विद्युत सहायक ह्या पदाची लिस्ट बद्दल हेड ऑफिस प्रकाशगड इथे कॉल केला असता अधिकारी लोक उडवा उडवीचे उत्तर देत आहेत त्यामुळे लाखो आय टी आय धारक बेरोजगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
त्यातच, दि 4 ऑगष्ट ला ऊर्जामंत्री महोदयानी आपल्या अधिकृत ट्विटर वर *उपकेंद्र सहाय्यकांच्या बहुप्रतीक्षित 2000 आणि विद्युत सहाय्यकाच्या 5000 पदांची महावितरणकडे भरती करण्याचे आदेश मी आज दिले आहेत. कोविड 19 (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे हे विलंब झाले. सर्व काही ठीक आहे हे संपेल !!*
अशी माहिती दिली परंतू मागील महिन्यात सूधा असेच आस्वासन दिले होते त्यामुळे एखादी तारीख निश्चित करुन सांगावी व भरती प्रक्रीया राबवावी, अन्यथा ऊर्जामंत्री यांच्या घरा पुढे अंदोलनाचा इशारा महारास्ट्रातील लाखो बेरोजगार आय टी आय धारक विध्यार्थ्यानी दिला.
सदर निवेदन *श्री विशाल भाऊ निंबाळकर (भा.ज.पा.युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रपूर) यांच्या मार्फत, मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटिवार माझी वित्तमंत्री तसेच व मा.आ.किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर वि. व याना तथा मा जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या कार्यालया मार्फत, मा.ऊर्जामंत्री नितिन राऊत साहेबाना देण्यात आले तेव्हा उपस्थित तथा आय टी आय धारक बेरोजगार विध्यार्थी,* आदिणी शेवटचे निवेदन देऊन नम्रपणे विनंती करित केली, की उर्जामंत्र्यांनी यात हस्तक्षेप करुण महावितरण ला विद्युत सहायक ची यादी लवकरात-लवकर प्रकाशीत करण्याचे व भरती प्रक्रिया राबऊन बेरोजगारांना न्याय द्यावा
अन्यथा महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण मा. ऊर्जामंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करतील. त्यामुळेच पुढील प्रक्रीया केव्हापर्यंत सुरू होईल याची निश्चीत तारिख जाहिर करावी व पुढील प्रक्रीया राबवावी.