मुंबई/प्रतिनिधी
संपूर्ण देशभर रजिस्ट्रेशन ऑफ इंडियाचे नोंदणी नसताना आणि चैनल जे लोक चालवत असतील अशांवर आता कारवाई होण्याची तयारी केंद्र सरकार तर्फे होत आहे. याबाबत केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की संपूर्ण देशात अनेक लोक प्रेस कार्ड गळ्यात घालून फिरताना दिसतात व काहीजण चैनल चालवतात त्यांची तात्काळ चौकशी करण्याचे व एफ आय आर दाखल करण्याचे आदेश गृह खात्याला दिले आहेत.
या बोगस पत्रकारमुळे इमानदार पत्रकारांची प्रतिमा कळते आहे आमच्याकडे अशी माहिती व तक्रारी आल्या आहेत की पैसे घेऊन खोटी प्रेस कार्ड वाटप होत आहेत त्यातील काहीजण ब्लॅकमेल करीत आहेत आणि आपला गोरखधंदा चालविता असे यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्रत्येक राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्यांना दिले आहेत
वृत्तपत्र टीव्ही रेडिओ भारत सरकारच्या आर एन आय आणि माहिती जनसंपर्क मंत्रालय मध्ये रजिस्टर असतील तेच ओळखपत्र अधिकृत देतील न्यूज पोर्टल केबल कोणालाही ओळखपत्र पत्रकार म्हणून देऊ शकत नाहीत असे जर पोलिसांच्या लक्षात आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्यामधून कोणालाही सूट मिळणार नाही
यामुळे पत्रकार क्षेत्रात न्यूज पोर्टल चालविणाऱ्या मध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत पत्रकारांनी दैनिक/ साप्ताहिक अधिकृत कामे करून आपले ओळखपत्र खिशात ठेवावे ओळखपत्र जे असेल ते पोलीस आर एन आई कडे मोबाईल वरुन तपास घेणार आहेत त्यामुळे ते दैनिक अथवा साप्ताहिक अधिकृत आहे की नाही हे पडताळणी करणार आहेत.