Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २५, २०२०

सैनिकांना मिलिटरी कट का असतो?

सैनिकांना मिलिटरी कट का असतो  ? 


फेसबुक लिंक https://bit.ly/31q23Ev
    मिलिटरीचे जवान दिसता क्षणी ओळखले जातात. यामागे अर्थातच त्यांची भारदस्त शरीरयष्टी हे कारण असते तरी अजून एक कारण आहे ज्यामुळे ते लगेच ओळखले जातात, आणि ते कारण आहे आर्मीच्या जवानांची हेअरस्टाईल!!*
छोटे छोटे केस ही आर्मीच्या जवानांची खरी ओळख असते. त्यांचे लहान केस बघून तुम्हाला प्रश्न पडत असेल यांचे केस लहान का असतात.
सैनिकांना बऱ्याचवेळा सैन्यात अंघोळीला वेळ मिळत नाही. जेव्हा रोज अंघोळ करणे शक्य होत नाही अश्यावेळी लहान केस ठेवणे कधीही चांगले कारण त्यामुळे इन्फेक्शनचा धोका टळतो. त्याचबरोबर सैनिकांना वेगवेगळ्या प्रकारचे हेल्मेट वापरावे लागतात, अशावेळी लहान केस बरे पडतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, सैनिकांची सर्वात मोठी शक्ती ही त्यांची एकाग्रता असते. आणि मोठे केस असले म्हणजे ते परत परत डोळ्यासमोर येण्याचा धोका असतो. अटीतटीच्या प्रसंगी केसांमुळे एकाग्रता भंग होऊ नये, म्हणून सुद्धा हा उपाय करण्यात येतो.त्याचबरोबर लहान केस असले म्हणजे डोकं हलके राहते. तसेच सैनिकांना नदी नाल्यांमध्ये नेहमी उतरावे लागते. बाहेर आल्यावर लवकर केस सुखावी आणि सर्दी सारख्या आजाराचा धोका टळावा हे पण एक कारण त्यामागे असते.
ही सर्व कारणे तुम्हाला लहान वाटत असतील. कारण तुम्हाला तेवढी मोठी जबाबदारी उचलावी लागत नाही, पण सैनिकाचे काम मोठे जबाबदारीचे असते. म्हणून त्यांना अश्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक असते.
लेखक : वैभव पाटील
_
__________________________


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.