Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २५, २०२०

नरमुख असणारी गणपतीची मुर्ती

⭕ नरमुख असणारी गणपतीची मुर्ती ⭕
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
दि २५ आॅगष्ट २०२०
जगात जेवढी म्हणून गणेश मंदिरे आहेत तेथे गणेश हा गजमुख आहे. तमिळनाडूतील एक मंदिर मात्र याला अपवाद असून येथे गणेश मानवी चेहरा असलेला आहे.
श्रीगणेशाला ‘गजमुख’, ‘गजानन’ अशी नावे आहेत ती त्याच्या हत्तीच्या मुखामुळे. भगवान श्रीशंकरांनी द्वार अडवणार्‍या बालगणेशाचे मुख त्रिशुळाने उडवले होते व नंतर शोकसंतप्‍त पार्वतीदेवीमुळे या बालकाला हत्तीचे मुख बसवण्यात आले, अशी पौराणिक कथा आहे.. महादेवांनीच गणेशांना ‘गणपती’ नाव दिले. त्याचा अर्थ सेनापती असा होतो. महादेवांनी त्याच वेळी गणेशांना नेहमी सर्वप्रथम पूजनीय होण्याचे वरदानही दिले होते. त्यामुळे जगभर गणेशाची मूर्ती ही ‘गजमुख’च दिसून येते. भारतात तामिळनाडूत मात्र गणपतीचे असे मंदिर आहे ज्याठिकाणी बाप्पाची मूर्ती ‘गजमुख’ नसून ती ‘नरमुख’ म्हणजेच मनुष्यासारखे मुख असलेली आहे.
तीलतर्पणपुरी या तमिळनाडूतील कुतनूर गावापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर असून त्याला आदिविनायक मंदिर असे म्हणतात. हे मंदिर फार मोठे नाही. मात्र त्याचे आणखी एक विशेष म्हणजे येथे भाविक पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा करतात. मानवी चेहरा असलेली ही मूर्ती जगात एकमेव आहे. असे सांगतात या ठिकाणी श्रीरामाने त्यांच्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून पूजा केली होती.याठिकाणी भगवान श्रीरामांनीही आपले दिवंगत पिता महाराज दशरथ यांच्यासाठी तर्पण केले होते.
तीलतर्पण या नावामागे हाच अर्थ आहे. तीलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित. पुरी म्हणजे नगर.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.