नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर जिल्हयातील हिंगणा तालुक्यातील स्थानिक स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत साजरा करण्यात आला
कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता व शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने यावर्षीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नव्हती परंतु शाळेच्या संचालिका अरुणाताई बंग यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन द्वारे घरूनच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा केला. विशेष म्हणजे अशाप्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करणारी देवकी बाई बंग इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही एकमेव शाळा असून ऑनलाइन साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी घरी राहूनच राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली तसेच भाषण देशभक्तीपर गीत , कविता ऑनलाइन सादर केल्या व शाळेतच असल्याची अनुभूती प्राप्त केली.
यावेळी संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, संचालक महेश बंग, अरुणा बंग,शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते,नितीन तुपेकर, अतुल कटरे, नितीन लोहकरे ,उमेश लोणारे ,विनोद वानखेडे ,ममता राणे, सोनम लारोकर, संगीता जोगे आदी उपस्थित होते.