मोहखेडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
प्रत्येक नागरीकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले आद्यकर्तव्य समजून एक झाड लावून त्या लावलेल्या झाडाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.असे विचार व्यक्त करून युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांनी वृक्षारोपनाचे महत्त्व समजावून सांगितले. मोहखेडी येथे स्वातंत्र दिनानिमित्त व काटोल विधानसभेचे युवासेना संपर्कप्रमुख मोहित कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. बांधकाम सभापती तथा युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे बोलत होते .
यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस कपिल भलमे,युवासेना संपर्क प्रमुख मोहित कोठे,शिवसेना उपतालुका प्रमुख तिलक क्षिरसागर,युवासेना वाडी शहर प्रमुख वाडी सचिन बोंबले, युवतीसेना काटोल शहर प्रमुख काटोल अपूर्वाताई पिट्टलवार,युवासेना काटोलचे पदाधिकारी अमोल तांदूळकर, युवतीसेना दोडकीपूरा शाखा प्रमुख आकांशा मुळे आणि मोहखेडी शाखा प्रमुख अविनाश महाजन, उपशाखा प्रमुख कुणाल महाजन, सचिव अंकित आटोने, कोषाध्यक्ष वृषभ झेलगोंदे, अक्षय आटोने ,प्रेमचंद आटोने,मनोज झेलगोंदे,कुणाल तागडे,अंकुश महाजन आदी युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.