Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १०, २०२०

चांप्यात विविध ठिकाणी जल्लोषात जागतिक आदिवासी दिवस साजरा

चांपा येथे क्रांतिवीर समशेर सिंग पारधी यांच्या पुतळ्याचे अनावरण,सोबतच पारधी टोलीचे समशेर नगर नामकरण




चांपा, ९: येथे आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधुन गटग्रामपंचायत चांपा येथिल पारधी बेड्यावर " क्रांतीवीर समशेरसिंग पारधी" स्मारकाचे अनावरण करण्यात आले असुन पारधी बेड्याचे "समशेर नगर" असे नामकरण करून जागतिक आदिवासी दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
नागपुर उमरेड तालुक्यांतील चांपा पारधी टोलीने वर्षानुवर्षे जातिवाचक वार झेलले. आता जुन्या जखमांना तिलांजली देत मोहरलेल्या मनाने माणूसपणाच्या नव्या लढाईस सज्ज झाले. चांपा पारधी टोलीचे समशेरनगर नामकरण झाले.
आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधुन नागपूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष- श्री बबनरावजी गोरामन व चांपा गटग्रामपंचायत चे युवा सरपंच - श्री अतिश पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्योत्तर काळानंतर आज पहिल्यांदाच आदिवासी पारधी समाजाचे आद्य क्रांतीवीर समशेरसिंग पारधी ज्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामची क्रांतीज्योत प्रज्वलित करून ब्रिटिश राजवटी विरूद्ध बंड पुकारत आपल्या देशासाठी सर्वोच्च बलीदान दिले तरीही आजवर या आदिवासी पारधी समाजाच्या क्रांतीवीर यांचा इतिहास लपवण्याचा मिटवण्याचा खुप प्रयत्न झाला.  आदिवासी पारधी समाजाला स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी उमरेड तालुक्यांतील चांपा पारधी टोली चे क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांचा आदर्श घेऊन जागतिक आदिवासी दिनी चांपा पारधी टोलीचे नामकरण समशेर नगर करण्यात आले.

 यावेळी क्रांतिवीर समशेर सिंग भोसले पारधी यांच्या पुतळ्याचे अनावरण रोटी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. रोहित माडेवार , यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.शिवाय या नगरात समशेर सिंग यांचा पूर्णाकृती पुतळा डॉ. रोहित दादा यांच्या सहकार्यानेच उभारण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राऊत,  सकाळ वृत्तपत्र विदर्भ संपादक- श्री.प्रमोदजी काळबांडे साहेब,  आदिवासी पारधी सामाजिक कार्यकर्ते- श्री. बबनराव गोरामन, गटग्रामपंचायत सरपंच- श्री.अतिशजी पवार , उपसरपंच अर्चना सिरसाम, अजय वाघ, सुबोध जंगम, खुशाल ढा क , प्रदीप लचे,माजी सरपंच शेषनगर- सौ. रेखाताई पवार, माजी सरपंच- श्री. सोनुजी गोरामन , लालचंद पवार, सुरेश मसराम, ईश्वर इरपाते, आदिवासीं युवा सेना अध्यक्ष शिवशंकर राजपूत, रंजीत भोसले आदी मान्यवरांच्या साक्षीने हा परिवर्तनाचा सोहळा साजरा होत होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.