Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २५, २०२०

पठाणपुरा वार्ड येथील 72 वर्षीय बाधिताचा मृत्यू


चंद्रपूर जिल्ह्यातील 1037 बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर शहर व नगरपरिषद भागात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार : जिल्हाधिकारी
Ø  24 तासात 76 बाधित;  बाधितांची एकूण संख्या 1571
Ø  516 वर उपचार सुरू
चंद्रपूरदि. 25 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटरथर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी व नोंद करण्यात येणार आहे. अशी माहिती व्हिडिओ संदेश जारी करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील  बाधितांची एकूण संख्या 1 हजार 571 वर पोहोचली आहे.  24 तासात 76 बाधित पुढे आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीजेन चाचणी चालू असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 1037 बाधित उपचाराअंती बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर 516 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज (दि.25) सकाळी 8.05 वाजता पठाणपुरा वार्ड चंद्रपूर येथील 72 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्टला दुपारी 3.35 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधित पुरुषाला श्वसना संदर्भातील समस्या तसेच न्यूमोनिया आजार होता. बाधितावर शर्तीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्रआज सकाळी 8.05 वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या 18 बाधितांची नोंद आहे. यातील चंद्रपूर जिल्ह्यातील 16 बाधित तर तेलंगाणा व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.
24 तासांत पुढे आलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक 37 बाधित चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्याचबरोबर बल्लारपूर 19, चिमूर 2, वरोरा 5, मुल 6, कोरपना 5, पोंभुर्णा एक व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून आलेला एक असे एकूण 76 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील तुकूमपंचशील चौकनगीनाबागदानववाडीबाजार वार्डमित्र नगरबाबूपेठजलनगरउत्तम नगरसमाधी वार्डरयतवारी कॉलनीजेबी नगरगांधी चौकअंचलेश्वर वार्डचोर खिडकीखापरी वार्डनाना पेठजीएमसी परिसरातील तर तालुक्यातील घुग्घुसदुर्गापूरमोरवा येथील बाधित पुढे आले आहेत.
बल्लारपूर शहरातील गोकुळ नगरझाकीर हुसेन वार्डदादाभाई नौरोजी वार्डशिवनगर वार्डसंतोषी वार्डगांधी वार्डश्रीराम वार्डकिल्ला वार्डबिल्ड गुरूनानक वार्ड तर तालुक्यातील कोठारी येथील बाधित ठरले आहेत.
चिमूर येथील एक तर तालुक्यातील कोलारा येथून एक पॉझिटिव्ह ठरला आहे. वरोरा येथील कर्मवीर वार्डबंगाली कॉलनीतिलक वार्ड तर तालुक्यातील वनोजाआर्वी येथील बाधित पुढे आले आहेत.मूल तालुक्यातील चिंचाळा गावातून बाधित ठरले आहेत.
कोरपना तालुक्यातील वरसडी गावातून तर विरुर गडेगाव येथून बाधित पुढे आले आहेत. पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट्टा गावातील एक पॉझिटिव्ह ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील असणारा बाधिताचा अहवाल चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला आहे.



वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1571 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 32 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 128 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 880 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 407 बाधित, 61 वर्षावरील 94 बाधित आहेत. तसेच 1571 बाधितांपैकी 1055 पुरुष तर 516 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरीलजिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
1571 बाधितांपैकी जिल्ह्यातील हजार 464 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 44 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.