रा.वि.काँ. चा कुलगुरूंना घेराव व निवेदन
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी नेते *जगदीश पंचबुधे* यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *राहुल कामळे* यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ.सुभाष चौधरी* यांचा घेराव करण्यात आला व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने *"साऊथ ऐशीयन युथ फेस्टिव्हल"* गणपत विद्यापीठ, मैसाना, अहमदाबाद गुजरात येथे झालेला आंतर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता, सदर समूहामध्ये एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते, परंतु आज दोन वर्षे उलटून सुद्धा सदर विध्यार्थ्यांना त्यांचे मानधन विद्यापीठाने दिलेले नाही आणि अनेक विद्यार्थी हे अश्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मानधनाच्या रकमेवर आपले पुढील शिक्षण घेत आहे आणि त्या रकमेवरच अन्य वेवस्था करीत असतात आणि आपल्या अभ्यासा सोबत आपला सांस्कृतिक कार्यक्रमाचा सराव सुद्धा करत असतात आणि आपले विद्यापीठ हे या विध्यार्थ्यांना त्यांचा हक्काचे मानधन सुद्धा वेळेवर देऊशक्त नाही तर मग या विद्यार्थ्यांनी आपले पुढील शिक्षण घ्यावे कशे..? विध्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सांस्कृतिक टीम मध्ये सहभाग घेऊन व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादर करून चुकी केली का..? विद्यार्थ्यांना मानधन वेळेवर देणे ही विद्यापीठाची जबाबदारी नाही का..? विद्यापीठ व प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांचा असाच छळ कधी पर्यंत करत राहील व या सर्व विध्यार्थ्यांना त्यांचा हक्काचे मानधन देणे ही कोणाची जबाबदारी..? या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावी व विध्यार्थ्यांना त्यांचे मानधन येत्या 6 दिवसात देण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी ही विद्यापीठ प्रशासनाची राहील अशी चेतावणी देण्यात आली त्यावर कुलगुरू यांनी सांगितले की मी या प्रकरणाची चवकशी करून विध्यार्थ्यांना 6 दिवसाच्या आत त्यांचे मानधन देण्याचे आदेश आताच काढतो व समबंधीत अधिकाऱ्यावर पुढील कारवाही करतो अशे आश्वासन कुलगुरु यांनी संघटनेस दिले
या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी पदवीधर संघ प्रदेश सचिव व पूर्व विदर्भ प्रमुख *दिनेश साळवे,* राष्ट्रवादी पदवीधर संघ नागपूर जिल्हाध्यक्ष *गौतम वैद्य,* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर उपाध्यक्ष *राहुल वाघमारे, शुभम शहारे, दिपक मरस्कोल्हे, मानसी पात्रीकर, मंगेश दानी, प्रणाली बान्ते, देवयानी चौधरी, प्रितम घ्यार, निशांत घोडे, जय पटेल, राहुल कोथळे, सागर गुप्ता, गौरव साळवे, राजू भुईकर,जय गाला,* इत्यादी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते