Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून २२, २०२०

कुलरचा करंट लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू #hardona #death #women #culler





▶️ हरदोना(खुर्द)येथील घटना, सर्वत्र शोककळा; हळहळ



गौतम धोटे आवारपूर  कोरपना
राजूरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनी जवळील हरदोना(खुर्द) येथील एका महिलेला कुलरचा करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सुमनबाई राजूरकर वयवर्ष अंदाजे 58 असे महिलेचे नाव असून सदर महिला 22 जून रोजी सकाळी अंदाजे 7 च्या सुमारास घरकाम करीत असताना कुलरचा स्पर्श झाल्याने करंट लागला.यामुळे सदर महिला जागेवरच बेशुद्ध पडली.लगेच ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.