नागपूर : अरूण कराळे:
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या परप्रांतातील कामगारांना पोटभर जेवण व पाण्याची व्यवस्था करीत महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस व कामगार दिन अनोख्या पध्दतीने वाडी ब्राम्हण सेनेतर्फे साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या फैलाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केल्याने त्याचा विपरीत परिणाम रोजमजुरीचे काम करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील कामगारांवर पडून जेथे काम सुरू आहे त्याच ठिकाणी स्वराज्यात जाण्याची बंदी अथवा साधन नसल्याने तसेच लॉकडाऊन पुन्हा वाढल्यास उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होणार यासाठी स्वतःच्या राज्यात लांब अंतराचा प्रवास गाठण्यासाठी आवश्यक ते सामान सोबत घेत सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेत झारखंड येथील पलामु जिल्हयात येणाऱ्या जपला गांवातील मूळ रहिवासी मनोज रजवाड,राजा रजवाड रजवाड,अजय,छोटन,बिरेंद्र,उपेंद्र,सरवन, अनिल,विनोद रजवाड असे एकूण नऊ कामगार लॉकडाऊनच्या तीन महिन्यापूर्वी भुसावळ येथील दिपनगर स्थित पॉवर प्लांट मध्ये रोजंदारीवर काम करीत होते.अचानक राज्यात संचारबंदी लागू होऊन रोजगार बंद झाल्याने या कामगाराजवळ जमापुंजी संपल्याने उपासमारीची वेळ आली त्यातच आपल्या राज्यात परत जाण्यासाठी कुठलेही साधन नसल्याने भुसावळ ते व्हाया नागपूर झारखंडचा जवळपास ११०० किलोमीटरचा प्रवास सायकलने करण्याचा निर्धार करीत मिळेल तेथे जेवण घेत दिवसा काही वेळ तर रात्री सुरक्षित ठिकाणी विश्राम घेत नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाने निघालेल्या या परप्रांतीय कामगारांची माहिती ब्राम्हण सेनेचे रामराज मिश्रा,राजू मिश्रा,मनीष द्विवेदी,सुनील पांडे,ओपी मिश्रा,विजय शुक्ला,विजय मिश्रा,अरुण त्रिपाठी,प्रतीक त्रिवेदी,संतोष दुबे,रानु तिवारी,योगेंद्र यादव,नीरज त्रिपाठी,शिवम शुक्ला, राकेश त्रिपाठी,अजय मिश्रा,सतीश उपाध्याय,अमित शुक्ला,आशुतोष उपाध्याय,कृष्णदत मिश्रा,चंदन झा आदींना माहिती मिळताच पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला त्यांचे स्वागत करून जेवणाची,पाण्याची तसेच काही वेळ विश्रांतीची व्यवस्था,आरोग्याची विचारपूस करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत तरुण कामगारांना पोटभर जेवण देऊन तसेच सोबत शिदोरी देऊन कामगार दिन साजरा केल्याने या स्तुत्य उपक्रमाबद्धल ब्राम्हण सेनेचे कौतुक केल्या जात आहे.